Indian Art : फोटोंमध्ये दिसतं ते देवाचं रुप प्रथमत: कोणी साकारलेलं माहितीये?

[ad_1]

Indian art history Interesting facts : देवदेवतांचा उल्लेख जरी केला तरीही एखाद्या ठराविक देव-देवतेचा चेहरा अनेकांच्याच डोळ्यांसरमोर उभा राहतो. आशीर्वाद देणारं, वरदहस्त असणारं, प्रसन्न चेहऱ्याचं ते रुप कोणाला मानसिक शांतता देतं, तर कोणाला आधार. अनेकांच्या मते तर हे रुप म्हणजे सर्वकाही. अशा या देवदेवतांचं रुप अनेक फोटो, टीव्ही मालिका इतकंच काय तर अगदी चित्रपटांच्या माध्यमातूनही पाहायला मिळालं. पण, प्रत्यक्षात देव-देवता, ऋषीमुनी कसे दिसत असतील हे प्रथमत: कोणाला सुचलं असेल? काही कल्पना आहे? 

मेनका, विश्वकर्मा, साक्षात लक्ष्मी, विष्णू, श्रीकृष्ण अशा एक ना अनेक देवदेवतांना, महाभारत- रामायणातील दैवी पात्रांना प्रत्यक्ष चित्ररुप आणि मानवी चेहरा देणारी ही व्यक्ती म्हणजे राजा रवि वर्मा. अध्यात्म आणि भक्तीला चित्ररुप देत सामान्यांना त्यांच्या आकलनशक्तीनुसार आपलेसे वाटतील असे देवदेवता राजा रवि वर्मा यांनी त्यांच्या कुंचल्यातून साकारले. 

भारतीय संकल्पनांना काही पाश्चिमात्य तंत्रांची जोड देत त्यांनी भारतीय कलेला एका वेगळ्या स्तरावर नेलं. 29 एप्रिल 1848 मध्ये केरळच्या तिरुवअनंतपुरम इथं त्यांचा जन्म झाला होता. राजा रवि वर्मा यांच्या कलेनं पाश्चिमात्य देशांमध्येही उत्तम प्रतिसाद मिळवला. त्यांनी रेखाटलेली चित्र 1893 मध्ये अमेरिकेच्या World’s Columbian Exposition, Chicago इथं प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती. 

राजा रवि वर्मा यांच्या चित्रकलेची वैशिष्ट्यं 

राजा रवि वर्मा यांच्या चित्र काढण्याच्या शैलीमध्ये युरोपीय चित्रकलेतील वास्तवदर्शी घटकांचा प्रभाव होता. त्यांनी पाश्चिमात्य तैल चित्रकलेचा सुरेख ताळमेळ भारतीय चित्रकलेशी साधला. त्यांनी जवळपास 2000 हून अधिक चित्र रेखाटल्याचं म्हटलं जातं. लक्ष्मी, सरस्वती आणि इतर देवदेवतांना त्यांनी सुरेख मानवी चेहऱ्यात सादर केलं. त्यांच्या या बहुमूल्य योगदानासाठी ब्रिटीश राजवटीदरम्यान केसर-ए-हिंद हा बहुमान त्यांना देण्यात आला होता.

indian art history Interesting facts Raja Ravi Varma whos prints gave Hindu gods their modern face Before TV and posters

फक्त देवदेवता आणि राजेरजवाडेच नव्हे तर समाजातील कैक घटकांना त्यांनी त्यांच्या चित्रात स्थान दिलं होतं. स्त्री किंवा पुरुषाच्या देहबोलीपासून चेहऱ्यावरील हावभाव, त्यांचा पेहराव, विविध प्रकारचे नैसर्गिक घटक, फुलं, प्राणी, पक्षी यांचीसुद्धा मांडणी त्यांनी आपल्या चित्रांतून केली. भारतीय संगीतकलेचीही झलक त्यांनी चित्रकलेतून दाखवली. अशा या कलाकारानं दिलेला कलेचा वारसा आजही अनेक होतकरु आणि उगवत्या कलाकारांसाठी प्रेरणास्त्रोत ठरतोय हेच खरं. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *