Operation Sindoor बद्दल मोठी अपडेट! 24 विमानतळे तात्पुरती बंद, तर ‘या’ शहरात आज संध्याकाळी 7 वाजेनंतर दुकानं आणि रेस्टॉरंट्स बंद

[ad_1]

India Pakistan War Operation Sindoor Airports Closed : आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. भारत पाकिस्तान युद्ध आणि ऑपरेशन सिंदूर अतर्गंत घडामोडींना वेग येत आहे. विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुढील आदेश येईपर्यंत देशातील 24 विमानतळ तात्पुरते सर्व नागरी विमान वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. प्रवाशांनी अधिकृत सूचनांची प्रतिक्षा करावी, असं NOTAM जारी केलं आहे. 

केंद्रशासित प्रदेशाच्या जनसंपर्क विभागानुसार, शुक्रवारी जारी केलेल्या निर्देशात, चंदीगडमधील दुकाने आणि रेस्टॉरंट्ससह सर्व व्यावसायिक प्रतिष्ठाने आज म्हणजेच 9 मे 2025 रोजी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, हे निर्बंध वैद्यकीय दुकानांना लागू होणार नाहीत. चंदीगड प्रशासनाने सकाळी हवाई हल्ल्याचे सायरन वाजवल्यानंतर काही तासांतच हा आदेश देण्यात आला, ज्यामध्ये संभाव्य हवाई हल्ल्यामुळे लोकांना घरातच राहण्याचा इशारा देण्यात आला. एका अधिकृत आदेशात म्हटलं आहे की, ‘हवाई दलाच्या तळावरून संभाव्य हल्ल्याचा हवाई इशारा मिळाला आहे. सायरन वाजवले जात आहेत. सर्वांना घरातच राहण्याचा आणि बाल्कनीपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

मोहाली प्रशासनाने हा इशारा 

मोहाली अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या संदेशात म्हटले आहे की, ‘चंदीगडच्या काही भागात अलर्ट जारी करण्यात आला आहे. मोहालीच्या सीमावर्ती भागात राहणाऱ्या लोकांना आम्ही घरातच राहण्याचा आणि खिडक्यांपासून दूर राहण्याचा सल्ला देत आहोत.
 

पुढील आदेश येईपर्यंत बंद हे विमानतळ सर्व नागरी विमानांचे ये जा बंद राहणार!

1. चंदीगड 

 2. श्रीनगर 

3. अमृतसर 

4. लुधियाना (एएआय) 

5. भुंतर (एएआय) 

6. किशनगढ (एएआय) 

7. पटियाला (IAF) 

8. शिमला (एएआय) 
 
9. कांगडा-गग्गल (एएआय) 

10. बठिंडा (CE) 
 
11. जैसलमेर (CE) 
 
12. जोधपूर (CE) 
 
13. बिकानेर (CE) 
 
14. हलवारा (IAF) 
 
15. पठाणकोट (CE) 
 
16. जम्मू (CE)
 
17. लेह (CE) 
 
18. मुंद्रा (अदानी)
 
19. जामनगर (सीई) 
 
20. हिरासर (राजकोट) (एएआय) 
 
21. पोरबंदर (एएआय) 
 
22. जागरूकता (AAI) 
 
23. मेणबत्ती (AAI) 
 
24. भुज (इ.स.)



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *