[ad_1]
गुरुवारी रात्री उशिरा पाकिस्तानने जम्मू-काश्मीर, राजस्थान आणि पंजाबमधील श्रीनगर ते जैसलमेर आणि पठाणकोट अशा 36 शहरांमध्ये किंवा जवळपासच्या भारतीय लष्करी तळांवर 300 ते 400 तुर्की ड्रोनने हल्ले केले, अशी माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी शुक्रवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेत दिली. लडाखमधील सियाचीन ग्लेशियर बेस कॅम्प आणि गुजरातमधील कच्छ परिसरातही पाकिस्तानी ड्रोन दिसले. हे दोन्ही ड्रोन एकमेकांपासून जवळपास 1400 किमी अंतरावर होते. ज्यामुळे हल्ला किती व्यापक होता हे दिसत आहे.
कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हवाई संरक्षण बंदुकांच्या आधारे 50 ड्रोन पाडण्यात आले. तसंच रेडिओ फ्रिक्वेन्सी जॅम करत आणखी 20 निष्क्रिय करण्यात आले.
हे ड्रोन निशस्त्र होते, ज्यामुळे पाकिस्तानने भारताचं संरक्षण किती मजबूत आहे याची चाचणी घेतली असावी असं दिसत आहे. पण अनेकांमध्ये कॅमेरे बसवलेले होते जे पाकिस्तानमधील ग्राउंड स्टेशनला फुटेज पुरवत असतील. सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानने असिगार्ड सोंगार ड्रोन वापरले होते. याचं उत्पादन करणाऱ्यांच्या माहितीनुसरा, “ते कोणत्याही प्रकारच्या दिवसा/रात्र लष्करी आणि सुरक्षा ऑपरेशन्समध्ये प्रभावीपणे वापरले जाऊ शकतात. त्यांची रेंज 5 किमी आहे.
भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने रोखलेल्या किंवा निष्क्रिय केलेल्या शेकडो ड्रोनचा वापर युद्धबंदी कराराचं उघडपणे करण्यात आलेलं उल्लंघन आहे, असंही यावेळी कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितलं.
यामध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर सतत लहान शस्त्रांच्या सहाय्याने करण्यात आलेला गोळीबार आणि तोफखान्याचा माराही समाविष्ट होता, ज्यामध्ये एका सैनिकासह 16 भारतीय ठार झाले अशी माहिती त्यांनी दिली.
प्रत्युत्तरादाखल, भारतीय लष्करानेही त्यांचं मोठं नुकसान केलं आहे असं कर्नल कुरेशी यांनी सांगितलं. त्यांनी शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रं पाडली आणि पाकिस्तानी हवाई संरक्षण नेटवर्क निष्क्रिय करून प्रत्युत्तर दिलं असंही त्या म्हणाल्या.
कर्नल कुरेशी यांनी सांगितलं की, पाडलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचं विश्लेषण केलं जाईल आणि त्यातून मिळालेले निष्कर्ष भारतावरील दहशतवादी हल्ल्यांशी पाकिस्तान किंवा त्यांच्या संबंध जोडणाऱ्या पुराव्यांमध्ये जोडले जातील. यातील काही ढिगारे पंजाबच्या अमृतसरमध्ये सापडले आहेत.
[ad_2]
Source link