‘या’ राज्यांमध्ये रात्रीच्या वेळी रेल्वे धावणार नाही; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर Indian Railway चा मोठा निर्णय!

[ad_1]

Operation Sindoor : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय सैनिकांनी ऑपरेशन सिंदूर घडवून आणलं. ऑपरेशन सिंदूर अतर्गंत भारतीय सैनिकांनी पाकिस्तान व्याप्त आणि पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळ नष्ट केलं. त्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानकडून भारतावर ड्रोन आणि मिसाइल हल्ले करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारतीय सैनिकांनी जबरदस्त प्रत्त्युत्तर देत हे हल्ले हाणून पाडले. त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानवर नामुष्कीची वेळ आली. 

पाकिस्तानकडून होणाऱ्या वारंवार हल्ल्याच्या प्रयत्नामुळे भारतीय सरकारकडून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येत आहे. पाकिस्तान आणि भारतातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारतीय रेल्वेने म्हटले आहे की, अमृतसर, भटिंडा, फिरोजपूर आणि जम्मू काश्मीरमध्ये रात्रीचे रेल्वे धावणार नाहीत. त्याशिवाय 15 हून अधिक रेल्वे गाड्यांवर परिणाम होणार आहे. भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय रेल्वेने जम्मू रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या जवळजवळ सर्व गाड्या रद्द केल्या आहेत. जम्मूला येणारी काही वाहने वाटेत थांबवून जम्मूला आणली जात आहेत. उत्तर रेल्वेने जाहीर केलेल्या यादीत 37 नावे आहेत.

पाकिस्तानने सीमावर्ती भागात ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न केल्यानंतर भारताने राजस्थान, पंजाब, जम्मू आणि गुजरात यासारख्या सीमावर्ती राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी केला आहे. अंबाला विभागाने जम्मू, अमृतसर आणि चंदीगडला जाणाऱ्या सर्व कोचिंग गाड्यांना पुढील सूचना मिळेपर्यंत कुरुक्षेत्र स्थानकावर थांबण्याचे आदेश दिले आहेत.

अंबाला एअर फोर्स स्टेशनवर सुरक्षा कडक करण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीला तोंड देता यावे म्हणून जिल्हा प्रशासन आणि लष्करी अधिकाऱ्यांनी हॉटलाइनद्वारे सतत संपर्क राखला आहे. पण, प्रशासनाने स्पष्ट केले आहे की अद्याप कोणताही विशेष इशारा जारी केलेला नाही आणि परिस्थिती पूर्णपणे सामान्य आहे.

 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *