MEA: ‘भारतीय लष्करला पूर्ण सूट, पाकिस्तानला परिस्थिती समजेना’, ड्रोन हल्ल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केली भूमिका

[ad_1]

MEA Press Conference on Pakistan Ceasefire: शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर काही तासातच पाकिस्तानने उल्लंघन केलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मेस्री यांनी ही माहिती दिली आहे. लष्कराला चोख प्रत्युत्तर देण्याचे आदेश देण्यात आल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले, ‘गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली लष्करी कारवाई थांबवण्यासाठी आज संध्याकाळी भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओंमध्ये एक करार झाला. मात्र, गेल्या काही तासांपासून पाकिस्तानकडून या कराराचे उल्लंघन केले जात आहे”. 

 

पुढे ते म्हणाले, “भारतीय सैन्य सीमेवरील या घुसखोरीला प्रत्युत्तर देत आहे आणि त्याचा सामना करत आहे. ही घुसखोरी अत्यंत निंदनीय आहे आणि त्यासाठी पाकिस्तान जबाबदार आहे. आम्हाला वाटतं की पाकिस्तानने ही परिस्थिती योग्यरित्या समजून घ्यावी आणि ही घुसखोरी थांबवण्यासाठी त्वरित योग्य ती कारवाई करावी.

याआधीही आज सकाळी पाकिस्तानने पुन्हा एकदा श्रीनगर, उधमपूर, आरएस पुरा, अखनूर, छंब, भिंबर गली, शोपियान, कुलगाम, अनंतनाग यासह अनेक भागात ड्रोन हल्ले केले. सैन्याने त्यांना हवेतच निष्क्रीय केलं. तसंच, या भागात ब्लॅकआउट लागू करण्यात आला आहे.

विविध ठिकाणी ड्रोन उडत असल्याचे वृत्त मिळाल्यानंतर, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानच्या सीमावर्ती भागात ब्लॅकआउट लागू करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुक्तसर साहिब, फिरोजपूर, पठाणकोट, जैसलमेर आणि अंबाला येथे अनेक ठिकाणी पूर्णपणे वीजपुरवठा खंडित झाला आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *