[ad_1]
India-Pakistan War Indians Refuse to Travel : भारत आणि पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थिती पाहता भारतातील अनेक मोठ्या ट्रॅव्हल एजन्सींनी तुर्की आणि अजरबैजानचे असलेले सगळे टूर पॅकेजेस आणि बूकिंग या रद्द केल्या आहेत. जम्मू-कश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानची साथ दिली आणि भारताला शांतता राखण्याचा सल्ला दिला. अजरबैजाननं त्यांच्या वक्तव्यात म्हटलं की आम्ही पाकिस्तानसोबत आहोत आणि दोन्ही बाजूच्या लोकांनी शांतता बाळगावी अशी विनंती करत आहोत. तर भारतानं दहशतवादी विरोधात घेतलेल्या कारवाईनंतर तुर्कीनं भारतीय सैनेन्यावर प्रश्न उपस्थित केला आहे.
भारतीय ट्रॅव्हल इंडस्ट्रीनं म्हटलं की ते अशा देशांना प्रमोट करू शकत नाही जे दहशतवादाला समर्थन करणाऱ्या देशासोबत आहेत. आता तुर्की आणि अजरबैजानसाठी टूर पॅकेज ना तर बनवण्यात येणार आहे नाही विकण्यात येणार आहे. हा निर्णय सगळ्या भारतीयांच्या भावना दुखावल्यानं घेण्यात आला आहे. हा निर्णय फक्त पर्यटनापर्यंत मर्यादीत नाही. तर तुर्की आणि अजरबैजानला एक संदेश देण्यात आला आहे. भारता विरोधात जर काही बोलण्यात आलं तर आता ते सहन केलं जाणार नाही. भारताची जनता आणि बिझनेस करणारे लोकं हे जागरुक आहेत आणि जे देश विरोधात बोलतात त्यांना आर्थिक लाभ देण्याच्या विरोधात आहेत.
यात कॉक्स अॅन्ड किंग्स, ईजमायट्रिप, ट्रॅव्होमिंट आणि इक्सीगो सारख्या मोठ्या ट्रॅव्हल कंपन्यांनी म्हटलं की त्यांनी अजरबैजान, उज्बेकिस्तान आणि तुर्कीच्या सगळ्या बूकिंग या कॅन्सल केल्या आहेत आणि जे लोकं फिरायला जाणार होते त्यांच्या पैकी अनेकांनी स्वत: त्यांची ही ट्रिप रद्द करण्याविषयी माहिती देखील दिली होती.
Enough is Enough! Blood and Bookings wont flow together. We are suspending all flight and hotel bookings for Turkey, China and Azerbaijan on ixigo.
— Aloke Bajpai (@alokebajpai) May 10, 2025
इक्सीगो ग्रुपचे सीईओ आलोक बाजपेयी यांनी शनिवारी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ही माहिती दिली की रक्त आणि बूकिंग एकत्र होऊ शकतं नाही. आम्ही Ixigo वर तुर्की, चीन आणि अजरबैजानला जाणाऱ्या सगळ्या फ्लाइट आणि हॉटेल बूकिंग कॅन्सल करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा : पाकिस्तान विजयी झाल्याचा शहबाज यांचा दावा! म्हणाले, ‘भारताने मशिदींवर…’
कंपन्यांनी सांगितलं की जर कोणी या देशात जाणारी ट्रिप रद्द करत असेल तर त्यांच्याकडून कोणतेही अधिकचै पैसे आकारले जाणार नाही. हा निर्णय या साठी घेतला आहे कारण अशा बातम्या तुर्कीमध्ये तनाव दरम्यान हे देश भारताविरोधात पाकिस्तानचे समर्थन करत आहेत. हे देखील म्हटलं जात आहे की पाकिस्ताननं नुकताच ड्रोननं जो हल्ला केला ते तुर्कीचे ड्रोन होते.
[ad_2]
Source link