तुमच्या आधारकार्डचा होतोय गैरवापर? सिमकार्ड खरेदी करून गुन्हा…; ऑपरेशन चक्र-V म्हणजे काय ?

[ad_1]

Cyber Crime Maharashtra: डिजिटल अटक, गुंतवणूक फसवणूक यांसारख्या गुन्ह्यांसाठी मोठ्या प्रमाणात बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतलेल्या सीमकार्डचा वापर केला जातो. सायबर गुन्हे रोखण्यास्राठी ऑपरेशन चक्र हाती घेतले आहे. या मोहीमेअंतर्गत सीबीआयने महाराष्ट्रासह देशभरातील आठ राज्यांत छापे टाकले. यामध्ये टेलिकॉम कंपन्यांच्या एजंटची झाडाझडती घेण्यात आली. सीबीआयने पाच एजंटना अटक केली असून त्यांच्या हजारो बनावट ओळखपत्र, शेकडो सीमकार्ड तसेच इतर कागदपत्रे जप्त केली आहेत. 

सायबर गुन्हे प्रचंड वेगात वाढत असून यामध्ये संघटित गुन्हेगारी प्रमाण अधिक आहे. डिजिटल अटक, गुंतवणुकीमध्ये परतावा देण्याचे प्रलोभन दाखवून फसवणूक अशा गुन्ह्यांच्या संख्या दिवसागणिक वाढत आहे. सायबरमधील ही संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी सीबीआय ऑपरेशन चक्र-५ ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. या गुन्ह्यांसाठी प्रामुख्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदी करण्यात आलेल्या सिमकार्डचा वापर केला जातो आणि यामध्ये टेलिकॉम कंपन्यांचे एजंट यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सीबीआयने टेलिकॉम ऑपरेटर्सच्या विविध ‘पॉइंट ऑफ सेल’ (पीओएस) एजंट्सनी जारी केलेल्या अनधिकृत सिमकार्डची विक्री आणि गैरवापर रोखण्यासाठी आसाम, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगण, कर्नाटक आणि तामिळनाडू या 8 राज्यांमधील 38 
सीबीआयचे देशातील आठ राज्यात छापे टाकले आहेत. त्याचबरोबर 42 ठिकाणी झाडाझडती घेण्यात आली त्यातून मोठ्या प्रमाणात सिमकार्ड आणि कागदपत्रे हस्तगत करण्यात आली.

पाच टेलिकॉम एजंटना अटक 

पॉइंट ऑफ सेल एजंट्सच्या 42 ठिकाणी छापे टाकले. सीबीआयने टाकलेल्या छाप्यांमध्ये अनधिकृत सिमकार्डच्या वितरणात सहभागी असलेल्या मध्यस्थांसह व्यक्तीची ओळख पटवण्यात आली. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, केवायसीसाठी बनविण्यात आलेली कागदपत्रे जप्त केली. इतकेच नाही तर गुन्ह्यातून मिळवलेल्या रकमेतून खरेदी केलेली जंगम मालमत्ता यावरही टांच आणण्यात आली. याप्रकरणी सीबीआयने केवायसी नियर्माचे उल्लंघन करूम अनधिकृतपणे सिमकार्ड विकल्याच्या कटात सहभागी असलेल्या पाच जणांना चार राज्यांतून अटक केली आहे. 

ऑपरेशन चक्र-5 म्हणजे काय ? 

देशातील सायबर धोक्याचा सामना करण्यासाठी, केंद्रीय अन्वेषण विभागाने आर्थिक फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्ह्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. अऑपरेशन चक्र नावाचे एक नवीन देशव्यापी अभियान सुरू केले आहे. आर्थिक गुन्हयांमध्ये सहभागी असलेल्या सायबर गुन्हेगारांविरुद्ध इंटरपोल, एफबीआय आणि अनेक देशांच्या पोलिस दलांच्या समन्वन्धने ऑपरेशन चक्र सुरू करण्यात आले आहे. याचाच पाचवा टप्पा म्हणजे ऑपरेशन चक्र 5 हे आहे. यात प्रामुख्याने डिजिटल अटक आणि गुंतवणूक फसवणूक रोखण्यासाठी वेगवेगळी पावले उचलली जात आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *