[ad_1]
CBSE Board Exam Results 2025: सीबीएसईची दहावी आणि बारावीची परीक्षा देणारे 42 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहेत. रिपोर्टनुसार, सीबीएसईचा दहावी आणि बारावीचा निकाल उद्या जाहीर होऊ शकतो. गतवर्षी बोर्डाने 13 मे रोजी निकाल जाहीर केले होते. यावर्षीही 13 मेपर्यंत निकालांची घोषणा होण्याची शक्यता आहे. पण अद्याप केंद्रीय माध्यमिक शैक्षणिक बोर्डाने याची अधिकृत घोषणा केलेली नाही. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी अधिकृत वेबसाईट cbseresults.nic.in वर जाऊन आपल्या निकालाची प्रत मिळवू शकतात.
या वेबसाईट्सवर पाहू शकता निकाल
cbse.gov.in
cbseresults.nic.in
results.cbse.gov.in
डिजिलॉकरवर अशाप्रकारे चेक करु शकता निकाल
स्टेप-1: ‘DigiLocker’ अॅप डाउनलोड करा.
स्टेप-2: digiLocker.gov.in वर जावा
स्टेप-3: तुमचा रोल नंबर, वर्ग, शाळेचा कोड आणि 6 अंकी पिन (शाळेने दिलेला) टाका.
स्टेप-4: पडताळणीसाठी तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावर पाठवलेला OTP टाका
स्टेप-5: तुम्हाला तुमची मार्कशीट स्क्रीनवर दिसेल
Umang अॅपच्या माध्यमातूनही पाहू शकता निकाल, जाणून घ्या पद्धत
स्टेप-1: ‘उमंग’ अॅप डाउनलोड करा
स्टेप-2: अॅप सुरु करा आणि शिक्षण सेक्शनमध्ये जाऊन सीबीएसई निवडा.
स्टेप-2: : तुमचा निकाल डाउनलोड करण्यासाठी आवश्यक माहिती भरा.
SMS च्या माध्यमातून निकाल कसा पाहायचा?
स्टेप-1- मेसेज सुरु करा
स्टेप-2: cbse10/ cbse12 असं टाइप करा
स्टेप-3: 7738299899 क्रमांकावर हा मेसेज पाठवा
स्टेप-4: तुम्हाला निकालाचा मेसेज येईल.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) लवकरच अधिकृत वेबसाइटवर दहावी आणि बारावीचा निकाल अपलोड करेल. यावर्षी 42 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 24.12 लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा आणि 17.88 लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.
[ad_2]
Source link