‘…तर गुपितं उघडी पडतील’ बॉलिवूडवाले सरकारविरोधात चिडीचूप! ED, CBI च्या भीतीनं… जावेद अख्तर असं का म्हणाले?

[ad_1]

Javed Akhtar : हिंदी कलाविश्वातील ज्येष्ठ लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी कायमच विविध मुद्द्यांवर त्यांची ठाम मतं मांडली आहेत. अगदी सत्ताधारी असो किंवा विरोधक, धर्म असो किंवा पंथ, कोणा एका व्यक्तीची भूमिका का असेना…. अख्तर यांनी आपली मतंसुद्धा अतिशय प्रत्ययकारीपणे मांडल्याचं आजवर पाहायला मिळालं आहे. हेच जावेद अख्तर आता बॉलिवूडकरांसंदर्भात म्हणजेत हिंदी कलाविश्वातील सेलिब्रिटींसंदर्भात अशा काही गोष्टींवर उजेड टाकून गेले आहेत की सर्वांचच लक्ष एका क्षणात त्यांच्या या वक्तव्यानं वेधलं आहे. 

हल्लीच एका मुलाखतीदरम्यान जेव्हा बॉलिवूड कलाकार सरकारविरोधात का बोलत नाहीत? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी या प्रश्नाचं उत्तर जरा स्पष्टच शब्दांत दिलं. कपिल सिब्बल यांना दिलेल्या मुलाखतीदरम्यान अख्तर यांनी कलाजगताशी संबंधित काही मुद्द्यांवर उजेड टाकला. यावेळी सिब्बल यांनी त्यांना एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला. हल्लीच्या दिवसांमध्ये जे कलाकार आहेत ते कधीच अमेरिकेत मेरिल स्ट्रीप यांनी ज्याप्रमाणं सरकारविरोधात आवाज उठवला होता तशा भूमिका घेत नाहीत; ही सर्व मंडळी शांत का आहेत? असा काहीसा तो प्रश्न. 

‘तुम्हाला खरंच उत्तर जाणून घ्यायचंय?’

सिब्बल यांनी विचारलेल्या या प्रश्नाचं उत्तर देताना अख्तर यांनी एक खोचक प्रतिप्रश्न करत, ‘तुम्हाला खरंच उत्तर जाणून घ्यायचंय?’ असं विचारलं. पुढे उत्तर देत ते म्हणाले, ‘तुम्हाला ठाऊकही नसेल की असं का होतंय. कसं आहे या मंडळीचं नाव मोठं आहे. मात्र त्यांचा आर्थिक स्तर इतका नाही ही वस्तूस्थिती. संपूर्ण कलाविश्वाला एक मध्यमवर्गीय इंटस्ट्रीअलिस्ट खिशात ठेवू शकतो. जो मोठा माणूस आहे, ज्याच्याकडे पैसे आहे त्यांच्यातलं कोण बोलतं? आहे का कोणी जो बोलला असेल? कोणीच नाही…’

यावेळी मेरिल स्ट्रीप या हॉलिवूड अभिनेत्रीचं उदाहरण देत त्यांनी ऑस्करच्या व्यासपीठावर स्पष्ट वक्तव्य करूनही त्यांच्यावर आयकर विभागाची धाड पडली नाही याची आठवण करून दिली. त्यामुळं भारतीय कलाकारांमध्ये असणारी ही असुक्षिततेची भावना खरी आहे की खोटी याच विवंचनेत आपण पडलो आहोत, असं अख्तर म्हणाले. मुळात ही शक्यता असू शकते. कारण, ही भीतीपर शक्यता असल्यास ईडी, आयकर विभाग, सीबीआय येईल आमच्या फाईली पुन्हा उघडल्या जातील या हेच विचार येतात… तपासाची भीती सतावते. मुळात ते कलाविश्वातील नसतीलही पण ते याच समाजात वावरत आहे ना. ते सामान्य म्हणून वावरत आहेत. या क्षेत्रात नुसतीच धुमधाम असून, फार कमी स्पष्कवक्ते इथं आहेत आणि त्यातलाच एक आहे. पण मला माहितीये इतर मंडळी का बोलत नाहीत…’ हा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *