Bad News! इन्फोसिस, TCS, Wipro नाही तर ‘या’ दिग्गज कंपनीने 10 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले

[ad_1]

Panasonic Lay Off: भारत-पाक या दोन शहरात तणावाची परिस्थिती असतानाच एका दिग्गज कंपनीने कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. टेस्ला कंपनीला बॅटरीचा पुरवठा करणाऱ्या जपानी इलेक्ट्रॉनिक्स कंपनी पॅनसॉनिकने ही घोषणा केली आहे. कंपनीने शुक्रवारी जगभरातील 10,000 कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. ही संख्या या कंपनीत काम करणारे जवळपास 230,000 कर्मचाऱ्यांच्याच्या 4 टक्के आहे. कंपनीने उत्पादनाचा विचार करुन हा निर्णय घेतला आहे. 

पॅनसॉनिक कंपनीने म्हटलं आहे की, ग्रुप कंपन्यांचा रिव्ह्यू केला जाणार आहे. विशेषतः सेल्स आणि इनडायरेक्ट विभागाचा. त्याव्यतिरिक्त ऑर्गनायजेशन आणि कर्मचाऱ्यांच्या संख्येचेदेखील रिव्हॅल्यूएशन केले जाणार आहे. कंपनीचे उद्दिष्ट्य जपानमध्ये 5 हजार कर्मचारी आणि इतर दुसऱ्या देशातील 5 हजार कर्मचारी आणि दुसऱ्या देशातील 5 हजार कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात येणार आहे. यादरम्यान कंपनी प्रत्येक देशात लागू असलेल्या श्रम संबंधी नियम-कायद्यांचे पालन करतील. 

कुकर, टिव्ही ते फ्रीज यासारख्या इलेक्ट्रॉनिक्स अप्लायसेन्स बनवणाऱ्या कंपनीने आज घराघरात एक वेगळी ओळख मिळवली आहे. ओसाका बेस्ड या कंपनीने एलन मस्कच्या इलेक्ट्रिक व्हेकल बनवणारी कंपनी टेस्लासाठी बॅटरी पुरवणारी मुख्य पुरवठादार कंपनी आहे. कंपनी हाउसिंग, एनर्जी आणि ऑटो सेक्टर्सशीदेखील जोडलेली आहे. पॅनासनोनिकने फेब्रुवारीमध्ये कंपनीमधील अनेक स्ट्रक्चरल इश्यू सोडवले होते. पॅनासॉनिकने फेब्रुवारीत कंपनीमध्ये अनेक स्ट्रक्चरल इश्यूज सोडवण्यासाठी एक मॅनेजमेंट रीफॉर्म प्रोग्रामचे आउटलाइन तयार करण्यात आला आहे. 

शुक्रवारी कंपनीने म्हटलं आहे की, या रिफॉर्ममध्ये प्रोग्रॅमच्या माध्यमातून कंपनीचे उद्दष्ट्य कमीत कमी 150 बिलियन येन (1 बिलियन डॉलर) तर नफा वाढवणे हा आहे. शुक्रवारी जारी केलेल्या संपूर्ण वर्षाच्या इनकम रिपोर्टमध्ये पॅनासॉनिकने या वर्षी नफ्यात 15 टक्क्यांचा तोटा झाला असून विक्रीत आठ टक्क्यांचा घट झाला आहे. पॅनासॉनिक होल्डिंग्सचे सीईओ युकी कुसुमीने जपानचे निक्केई वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं आहे की, दुसऱ्या कंपन्याच्या तुलनेत चांगली कामगिरी करण्यासाठी कर्मचाऱ्यांची कपात गरजेची आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *