[ad_1]
भारत पाकच्या युद्धजन्य काळात अनेक देशांनी भारताला पाठिंबा दिला. मात्र तुर्कीएनं पाकिस्तानला पाठिंबा दिला. त्यामुळे संतापलेल्या भारतीय व्यापा-यांनी आता तुर्कीयेच्या सफरचंदांवरच बहिष्कार टाकला आहे. पुण्यातील व्यापा-यांनी तुर्कीयेच्या सफरचंदाची खरेदी-विक्री बंद केली आहे. त्यामुळे तुर्कीयेच्या आर्थिक नाड्या आवळल्या जाणार आहेत.
भारत-पाकिस्तानमधील युद्धजन्य काळात जगभरातील विविध देशांकडून भारताला पाठिंबा मिळाला. भारताच्या दहशतवादविरोधी कारवाईत अनेक देश एकवटले आहेत. असं असताना तुर्कीयेनं मात्र दहशतवाद पोसणा-या पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे. त्यानंतर पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कियेला भारतीय व्यापाऱ्यांनी धक्का दिला आहे. ‘बॅन तुर्कीये’ हा ट्रेंड चालवत पुण्यातील व्यापा-यांनी तुर्कीयेच्या सफरचंदांवरच बहिष्कार घातला आहे.
व्यापाऱ्यांनी तुर्कीयेच्या सफरचंदाऐवजी इराण, वॉशिंग्टन आणि न्यूझीलँडच्या सफरचंदाला पसंती दिली आहे. इराण, वॉशिंग्टन आणि न्यूझीलँड सफरचंदाच्या भावात पेटीमागे 200 ते 300 रूपयांची वाढ झाली आहे. मार्केट यार्डात देशासह परदेशातून सफरचंदांची आवक होत असते. तुर्कीयेच्या सफरचंदावर बहिष्कार टाकल्यानं त्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं, असा दावा केला जात आहे.
इराणचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर आपल्याकडे तुर्कीये सफरचंदाचा हंगाम चांगला चालतो. इतर देशातील सफरचंदांपेक्षा तुर्कीये सफरचंद परवडते. यंदा उत्पादन कमी असलं तरी भारत-पाकिस्तान युध्दजन्य परिस्थितीत तुर्कीयेनं पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी तुर्कीकडून खरेदी बंद केली आहे. त्यामुळे तुर्कीयेचं कोट्यवधींचं नुकसान होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
यंदा पावसामुळे रस्ते बंद होते. त्यानंतर पहलगाम आणि सध्या तणावाच्या परिस्थिीतीमुळे सफरचंदावरील प्रक्रिया ठप्प झाली आहे. भारत-पाकिस्तान तणावाच्या परिस्थितीमुळे नियंत्रित तापमान कक्षात ठेवण्यात आलेल्या काश्मीरच्या सफरचंदाची आवक कमी झाली आहे. मात्र पाकिस्तानला पाठिंबा दिलेल्या तुर्कीयेला व्यापा-यांनी उत्तम दणका दिला आहे. तुर्कीयेच्या सफरचंदावर बहिष्कार टाकून त्यांची आर्थिक कोंडी करण्याचा हा योग्य प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.
[ad_2]
Source link