भारताचं ‘पाकिस्तानभेदी’ आकाश क्षेपणास्त्र, ज्याने पाकला दाखवली जागा

[ad_1]

ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास : ऑपरेशन सिंदूर राबवत भारतीय सैन्यानं पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त केलेत. त्यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताच्या आकाश क्षेपणास्त्राने पाकिस्तानचे मिसाईल उद्ध्वस्त करत पाकचे हल्ले परतवून लावले.. याच आकाश क्षेपणास्त्रासंदर्भात जाणून घेऊया सविस्तर.. 

ऑपरेशन सिंदुरमध्ये भारताने पाकमधील 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केलाय.. त्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारतावर अयशस्वी प्रयत्न केले. मात्र हे सगळे प्रयत्न भारतीय सैन्याने हाणून पाडले.. यामध्ये मोलाची कामगिरी बजावली ती भारताच्या आकाश क्षेपणास्त्राने पाकिस्तानच्या फतेह – 1 या क्षेपणास्त्रासोबतच आकाशने पाकच्या अनेक क्षेपणास्त्रांची हवेतल्या हवेतच चिंधड्या उडवल्या. 

पाकिस्तानकडून आलेली ही अस्त्र हवेतच संपवण्यात आकाश एअर डिफेन्स सिस्टिमने महत्त्वाची भूमिका बजावलीय.. आणि पाकचे मनसुबे उधळून लावलेत.. आकाश ही भारताची स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्र प्रणाली आहे.. 

भारताचं ‘पाकिस्तानभेदी’ आकाश 

– आकाश ही भारताची स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्र प्रणाली
– जमिनीवरुन हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली
– DRDO कडून आकाश एअर डिफेन्स सिस्टिम विकसित 
– भारतीय सैन्य आणि एअर फोर्समध्ये 2014 साली तैनात 

भारतीय लष्कराच्या ताफ्यातील आकाश संरक्षण प्रणाली ही पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र आमि ड्रोन्सचा कर्दनकाळ ठरलीय.

भारताचं  ‘पाकिस्तानभेदी’ आकाश 
काय आहेत आकाशची वैशिष्ट्य? 

– रेंज 
 45-70 किमी

– लक्ष्य 
 फाइटर जेट्स, ड्रोन, क्रूज मिसाईल आणि बॅलेस्टिक मिसाईल

– मार्गदर्शन 
डिजिटल ऑटोपायलटसह कमांड 

– स्फोटकं वाहून नेण्याची क्षमता
60 किलोग्राम उच्च-स्फोटकं

– तैनाती 
 मोबाईल लॉन्चर, टँक आणि ट्रकवर तैनात

– अचूकता 
 90 ते 100 टक्के 

दरम्यान भारतीय बनावटीच्या आकाश एअर डिफेन्स सिस्टीमची 3 व्हेरियंट भारताने विकसीत केलेत.

– पहिलं आकाश MK – 
 रेंज 
30 किलोमीटर

दूसरं आकाश MK 2
  रेंज 
40 किलोमीटर

तिसरं आकाश NG 
रेंज 
80 किलोमीटर

भारतीय बनावटीच्या आकाश क्षेपणास्त्र प्रणालीने पाकिस्तान्यांच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन्सची राख करत भारत मातेचं संरक्षण केलं आहे. त्यामुळे पाकड्यांना भारताच्या सामर्थ्यांची उंची समजायला मदत मिळालीय.. यापुढेही कधी पाकिस्तानने भारताकडे वाकड्य़ा नजरेनं पाहण्याची हिम्मत केली तर त्यांना जशास तसं उत्तर द्यायला आकाश सज्ज आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *