[ad_1]
SSC Result: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाकजून नुकताच दहावीचा निकाल जाहीर करण्यात आलाय.यंदाच्या वर्षी राज्यात दहावीचा एसएससी बोर्डाचा एकूण निकाल 94.10 टक्के इतका लागला. यंदाही कोकण विभाग निकालात अव्वल ठरला असून, हा निकाल 98.82 टक्के इतका लागला. तर, निकालात 90.78 टक्क्यांसह नागपूर विभाग सर्वात मागे असल्याचं स्पष्ट झालं. दरम्यान मध्य प्रदेशमधील दहावीच्या एका निकालाची चर्चा सध्या होतेय. कारण या शाळेत दहावीच्या विद्यार्थीनीला 7 शिक्षक शिकवत होते. काय लागलाय तिचा निकाल? जाणून घेऊया.
लखनपुरा हायस्कूल मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील शाळा सध्या चर्चेच कारण बनलीय. कारण या शाळेची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. या शाळेत पहिली ते दहावीपर्यंत संपूर्ण शाळेत फक्त 34 विद्यार्थी आहेत आणि त्यांच्यासाठी 7 शिक्षक आहेत. या 7 शिक्षकांपैकी 3 गेस्ट टिचर आहेत. या शाळेत दहावीत फक्त एकच मुलगी होती. तिला 7 शिक्षक शिकवत होते.
7 शिक्षकांनी दहावीची तयारी करुन घेतल्यानंतरही ती विद्यार्थीनी नापास झाली. दहावीच्या एका विद्यार्थ्यीनीला प्रत्येक विषयात थेअरीत फक्त 4 ते 7 गुण मिळाले. दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थीनीला 500 पैकी फक्त 133 गुण मिळाले आणि ती नापास झाली. म्हणजे या शाळेतील संपूर्ण दहावीचा वर्ग नापास झाला. कारण ती संपूर्ण वर्गात एकटीच मुलगी होती. यावरून या शाळेची काय अवस्था आहे याचा अंदाज येऊ शकतो. गुना येथील खजुरी शाळेतही अशीच परिस्थिती होती. इथेही दोन्ही विद्यार्थी परीक्षेत नापास झाले.
70 टक्क्यांहून अधिक मुले नापास
यावेळी परीक्षेत फक्त या दोन शाळांचीच नाही तर संपूर्ण परिसराची स्थिती वाईट होती. 25 शाळांमध्ये 70 टक्क्यांहून अधिक मुले नापास झाली आहेत. ग्वाल्हेरमधील लखनपुराच नाही तर अशा 87 शाळा आहेत ज्यांची स्थिती आणखी चिंताजनक आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. म्हणजेच संपूर्ण शाळेत फक्त 10 विद्यार्थी शिक्षण घेतात. घाटीगाव ब्लॉकमधील अनेक गावांमधील शाळांची अवस्थाही अशीच असल्याची माहिती जिल्हा पंचायत सदस्या आशा जसवंत सिंह झाला यांनी दिली.
मुख्याध्यापकांचे वेतन रोखण्याची कारवाई
अशा अनेक शाळा आहेत जिथे शिक्षक आहेत. पण शाळेत फक्त 2 ते 3 मुले शिकत आहेत. लखनपुराचा निकाल शून्य लागल्याने याची चौकशी केली जातेय. हायस्कूल परीक्षेदरम्यान, 8 लोकांचा सेटअप बनवला जातो. यामध्ये एक मुख्याध्यापक, एक प्रयोगशाळा सहाय्यक आणि 6 शिक्षकांचा समावेश आहे. अशावेळी ज्या शाळांचा निकाल कमी आहे. त्या शाळांच्या मुख्याध्यापकांचे पगार रोखण्याची कारवाई केली जात असल्याची माहिती जिल्हा शिक्षण अधिकारी अजय कटियार यांनी दिली.
[ad_2]
Source link