हॉटेलमध्ये पोहोतचाच गर्लफ्रेंडचा फोन WiFi ला झाला कनेक्ट, शोध घेतला असता धक्कादायक सत्य उघड, तिथेच…

[ad_1]

टेक्नॉलॉजी आज आपल्या सगळ्यांच्याच जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. पण याचमुळे नात्यामध्ये दुरावा देखील निर्माण होत असल्याचे दिसत आहे. अशीच एक घटना सध्या घडली आहे. दोन प्रेमीयुगुलांमध्ये या टेक्नॉलॉजीमुळे चक्क दुरावा निर्माण झाला आहे. 

एका प्रियकराने आपल्या प्रियसीला सोडून दिले कारण तिचा फोन हॉटेलच्या वाय-फायशी आपोआप कनेक्ट झाला होता. जिथे ती यापूर्वी कधीही गेली नसल्याचा दावा तिने केला होता.

ली नावाची ही महिला मे महिन्याच्याच्या सुट्टीत तिच्या प्रियकरासह चोंगकिंगमधील एका हॉटेलमध्ये गेली होती. चेक इन करताना, लीला लक्षात आले की, ती तिचे ओळखपत्र विसरली आहे आणि तिने तिचे डिजिटल ओळखपत्र काढण्याचा प्रयत्न केला. चोंगकिंग टीव्हीचा हवाला देऊन, साउथ चायना मॉर्निंग पोस्टने वृत्त दिले की, तिचा फोन ताबडतोब हॉटेलच्या वाय-फाय नेटवर्कशी कनेक्ट झाला.

संशयामुळे प्रियकराने तोडले नाते 

जेव्हा लीच्या प्रियकराने हे पाहिले तेव्हा त्याला संशय आला. ज्या हॉटेलमध्ये ते पहिल्यांदाच भेट देत होते, त्या हॉटेलचे नेटवर्क तिच्या फोनला आपोआप कसे कनेक्ट झाले? बॉयफ्रेंडने याबाबत विचारले असता, लीने आपण येथे कधीच न आल्याच सांगितलं आणि तिचा फोन आपोआप कसा कनेक्ट झाला हे तिला माहित नव्हते. पण बॉयफ्रेंडला ही गोष्ट पटली नाही आणि त्याने तेथेच नातं संपवलं. 

काय आहे नेमकं सत्य? 

बॉयफ्रेंडच्या अशा वागण्याने ली खूप हैराण झाली. नेमकं काय झालं ते शोधून काढण्याचा प्रयत्न केला. जशी जशी ती या प्रश्नाच्या खोलवर पोहोचली तेव्हा तिला यामागचं सत्य काय? याची जाणीव झाली. ली चोंगकिंगमध्ये इतर हॉटेलमध्ये काम करत होती. तेव्हा ती युझरनेम आणि पासवर्डसोबत कनेक्ट झालं होतं. 

लीने लगेच तिच्या Ex बॉयफ्रेंडला संपर्क साधला, पण त्याने तिला आधीच ब्लॉक केले होते. म्हणून, त्याने चोंगकिंग टीव्हीशी संपर्क साधला आणि काय घडले हे जाहीरपणे स्पष्ट केले – तिला परत मिळवण्यासाठी नाही तर त्याच्या मनातील तिची प्रतिमा सुधारण्यासाठी. 

अशाप्रकारे, चोंगकिंग टीव्हीच्या एका रिपोर्टरने लीसोबत घडलेल्या या गोष्टीची पुर्तता केली. तिचा फोन, जो एकेकाळी लीच्या जुन्या ऑफिसमध्ये कनेक्ट होता, तो हॉटेलमध्येही आपोआप कनेक्ट झाला, ज्यामुळे सर्वकाही स्पष्ट झाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *