[ad_1]
4 Years baby dies in attack by dog: गुजरातच्या अहमदाबाद शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील हातीजण परिसरातील एका रेसिडेन्शल सोसायटीत सोमवारी रात्री चार महिन्यांच्या बाळावर एका पाळीव रॉटवीलर कुत्र्याने हल्ला केला. हा हल्ला जीवघेणा ठरला. ही माहिती मंगळवारी पोलिसांनी दिली. ही घटना घडली तेव्हा बाळाची मावशी तिला सोसायटीच्या कॉमन गार्डनमध्ये घेऊन गेली होती. त्याच वेळी सोसायटीतील एका महिला रहिवाशाने तिचा पाळीव रॉटवीलर कुत्रा फिरवायला खाली आणला होता. ती फोनवर बोलत असताना अचानक कुत्रा कंट्रोलच्या बाहेर गेला आणि महीला मालकाच्या ताब्यातून सुटून बाळ आणि त्याच्या मावशीवर हल्ला केला.
नक्की काय झालं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळाची मावशी तिला संध्याकाळी सोसायटीच्या कॉमन गार्डनमध्ये घेऊन गेली होती. त्याच वेळी सोसायटीतील एक महिला तिचा रॉटवीलर कुत्रा खाली फिरवण्यासाठी घेऊन आली होती. ती फोनवर बोलत असताना कुत्रा अचानक आक्रमक झाला आणि ताब्यातून सुटून थेट बाळ आणि त्याच्या मावशीवर झडप घातली. दरम्यान, जवळच उभ्या असलेल्या आणखी एका महिलेने मुलाला वाचवण्यासाठी धाव घेतली. तिने ताबडतोब बाळाला हातात घेतले आणि तेथून निघून गेली. त्यानंतर बाळाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.
हे ही वाचा: Imran Khan News: इम्रान खान यांची तुरुंगात हत्या? पाकिस्तान सरकारने काय म्हटलंय जाणून घ्या
बाळाच्या मानेवर आणि डोक्यावर खोल जखमा झाल्यामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचे बाळाचे मामा राजू चौहान यांनी पत्रकारांना सांगितले. घटनेची माहिती मिळताच अहमदाबाद ग्रामीणच्या विवेकानंदनगर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला.
तातडीने नेण्यात आले रुग्णालयात
जखमी अवस्थेत दोघांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र बाळाचा मृत्यू झाला. मावशीवर सध्या उपचार सुरू आहेत. पोलिस निरीक्षक हितेश बारिया यांनी सांगितले की, बाळाच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले असून अहवालानंतर एफआयआर दाखल केला जाईल.
हे ही वाचा: MS Dhoni भारतीय सैन्यात आहे ‘या’ पदावर, त्याला किती पगार मिळतो माहितेय? जाणून घ्या
घटना सीसीटीव्ही कैद
ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येते, ज्यात मोठ्या आकाराचा रॉटवीलर कुत्रा बाळ आणि त्याच्या मावशीवर झडप घालताना दिसतो. या प्रकरणाची तपासणी अहमदाबाद ग्रामीण पोलीस करत आहेत. बाळाच्या मामाने पत्रकारांना सांगितले की, बाळाच्या मानेवर आणि डोक्यावर गंभीर जखमा झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
અમદાવાદના હાથીજણમાં રાધે રેસીડેન્સીમાં પાલતું શ્વાને કાળો કેર વર્તાવ્યો. 4 મહિનાની બાળકી અને કાકી પર કર્યો હુમલો, બાળકીનું મોત… #Ahmedabad #Gujarat #Dog #AMC pic.twitter.com/mkiLAjI77l
— Rakesh Parmar (@DRakesh1011) May 13, 2025
अहमदाबाद महानगरपालिकेच्या नियमांनुसार, पाळीव कुत्र्यांची नोंदणी करणे अनिवार्य आहे. पण या कुत्र्याच्या मालकिणीने नोंदणी केली की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.बाळाच्या कुटुंबाने कुत्र्याच्या मालकाविरुद्ध पोलिस तक्रार दाखल केली. सोसायटीतील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीही कुत्र्याने दोन लोकांना चावले होते. या प्रकरणासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती, परंतु कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
[ad_2]
Source link