Virat Kohli New Haircut : भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) हा जगातील पर्वत प्रसिद्ध क्रिकेटर्सपैकी एक आहे. विराटाचे जगभरात करोडो चाहते असून त्याला फॅन्स ‘किंग कोहली’ या नावाने देखील पुकारतात. किंग कोहली जे काही करतो तो जगात एक नवा ट्रेंड बनतो,. मग त्याची हेअर स्टाईल असो, दाढी असो किंवा मग फिटनेस आणि टॅटू. सध्या विराट कोहली ऑस्ट्रेलियामध्ये असून तो बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) स्पर्धेत टीम इंडियाचा भाग आहे. भारत – ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात चौथी टेस्ट 26 डिसेंबर पासून मेलबर्न येथे होणार आहे. त्यापूर्वी विराटने नवा हेअर कट केला असून सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विराटने ऑस्ट्रेलियातील एका हेअर स्टायलिस्टकडून नवा हेअरकट केला असून या लूकमध्ये कोहली अजूनच डॅशिंग दिसतोय. विराटचा हेअरकट त्याचे चाहते खूप पसंत करत आहेत. आता भारताच्या स्टार क्रिकेटरचा हा लूक त्याच्यासाठी लकी ठरणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण सध्या सुरु असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सिरीजमध्ये विराटच्या बॅटमधून निघालेलं एक शतक वगळता खास कामगिरी झालेली नाही. शतक वगळून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या चार इनिंगमध्ये त्याच्या बॅटमधून केवळ 26 धावाच निघाल्या. सध्याच्या सिरीजमध्ये त्याने आतापर्यंत पाच इनिंगमध्ये 31.50 च्या सरासरीने 126 धावा केल्या आहेत.
हेही वाचा : कोण आहे सुशीला मीणा? जिच्या बॉलिंग स्टाईलचा फॅन बनला क्रिकेटचा देव, Video शेअर करून केलं कौतुक
पाहा व्हिडीओ :
The new haircut of Virat Kohli
THE KINGS NEW CROWN pic.twitter.com/wrkeEqwnLg
Virat Kohli Fan Club (Trend_VKohli) December 20, 2024
मेलबर्न एअरपोर्टवर पत्रकारांवर भडकला विराट :
चौथ्या टेस्ट सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघ दोन दिवसांपूर्वी मेलबर्नमध्ये दाखल झाला आहे. दरम्यान यावेळी विमानतळावर भारतीय क्रिकेटर विराट कोहलीचा ऑस्ट्रेलियाचा प्रसारमाध्यमांशी वाद झाला. मीडियाकडून परवानगीशिवाय आपल्या मुलांना शूट केलं जात आहे समजलं तेव्हा विराट कोहली पत्रकारांवर संतापला. यावेळी विराटने आपली भूमिका स्पष्ट करत, “मला माझ्या मुलांसह प्रायव्हसी हवी आहे. मला विचारल्याशिवाय तुम्ही शूट करु शकत नाही,” असं त्याने बजावलं. त्यानंतर पत्रकार आणि कॅमेरामनने विराट कोहलीला त्याच्या कुटुंबातील सदस्यांना शूट केलं जात नसल्याचं समजावून सांगितलं. यानंतर वाद मिटला आणि जाण्यापूर्वी विराट कोहलीने कॅमेरामनसह हस्तांदोलन केलं.
बॉर्डर गावसकर ट्रॉफीचं वेळापत्रक :
पहिली टेस्ट: 22 ते 26 नोव्हेंबर
दुसरी टेस्ट: 6 ते 10 डिसेंबर
तिसरी टेस्ट: 14 ते 18 डिसेंबर
चौथी टेस्ट: 26 ते 30 डिसेंबर
पाचवी टेस्ट: 3 ते 7 जानेवारी
कुठे पाहता येणार सामना?
एडिलेड येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार दुसरा टेस्ट सामना हा प्रेक्षकांना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स आणि डीडी स्पोर्ट्स या चॅनलवर पाहता येईल. तसेच या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिझनी हॉटस्टारवर करण्यात येईल. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 5 वाजता सुरु होईल.