IND VS WI : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India VS West Indies) यांच्यात तीन सामन्यांची वनडे सीरिज सुरु असून रविवारी यातील पहिला सामना पार पडला. तर यापूर्वी झालेल्या तीन सामन्यांच्या टी 20 सीरिजमध्ये टीम इंडियाने (Team India) 2-1 ने आघाडी घेऊन सिरीज नावावर केली होती. पहिला सामना बडोदामधील कोटंबी स्टेडियममध्ये खेळवला गेला. सामन्यादरम्यान फिल्डिंग करताना भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिने हवेत उडी मारून जबरदस्त कॅच पकडला जे पाहून सर्वच थक्क झाले.
टीम इंडियाने वेस्टइंडीजला पहिल्या सामन्यात विजयासाठी 315 धावांचे आव्हान दिले होते. यावेळी टीम इंडियाच्या गोलंदाजी समोर वेस्टइंडीजच्या चार विकेट्स पडल्या यावेळी त्यांचा स्कोअर 11 धावा होता. वेस्ट इंडिजच्या आलिया एलीनी आणि शॅमीन कॅंपबेल या दोघी फलंदाजी करत होत्या, संघासाठी मोठी धावसंख्या करण्याच्या मानसुब्यात असताना आलिया एलीनीने भारताची गोलंदाज रेणुका सिंह हिने टाकलेला बॉल लॉन्ग ऑनच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु हरमनप्रीत कौरने तिची कॅच पकडली.
हरमनप्रीत कौरने पाहिलं की बॉल तिच्याकडे येतोय. मग तिने हवेत उडी मारून एका हाताने जबरदस्त कॅच पकडला. हा अविश्वनीय कॅच पाहून स्टेडियममधील उपस्थित असलेल्या प्रेक्षक आश्चर्य चकित झाले. ज्यामुळे केवळ 26 धावांच्या आधीच वेस्ट इंडिजचा अर्धा संघ माघारी परतला. कॅच पकडल्यावर हरमनप्रीत कौर सुद्धा चकित झाली होती, कारण फलंदाज आलियाने मारलेला हा शॉट खूपच वेगवान होता.
हेही वाचा : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या शेड्युलबाबत मोठी अपडेट, ‘या’ देशात खेळवले जाणार भारताचे सामने
टीम इंडियाने वेस्ट इंडिजच्या सर्व विकेट्स घेऊन त्यांच्यावर 211 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाकडून प्रथम फलंदाजी करणाऱ्या स्मृती मानधनाने 91 धावा केल्या. तर टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 9 विकेट्स गमावून 314 धावा केल्या होत्या. ज्यामुळे टीम इंडियाने तीन सामन्यांच्या वनडे सीरिजमधील पहिला सामना जिंकून सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मंगळवारी 24 डिसेंबर रोजी भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा सामना पार पडेल.
पाहा व्हिडीओ :
Harmanpreet Kaur – Take A Bow
Live https://t.co/OtQoFnoAZuTeamIndia | INDvWI | ImHarmanpreet | IDFCFIRSTBank pic.twitter.com/Fkuyj75Ok0
— BCCI Women (BCCIWomen) December 22, 2024
भारतीय संघ प्लेईंग 11 :
स्मृती मानधना, प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, सायमा ठाकोर, तीतास साधू, प्रिया मिश्रा, रेणुका ठाकूर सिंग
वेस्ट इंडिज प्लेईंग 11 :
हेली मॅथ्यूज (कर्णधार), कियाना जोसेफ, शेमाइन कॅम्पबेल (विकेटकीपर), डिआंड्रा डॉटिन, रशादा विल्यम्स, झैदा जेम्स, शबिका गजनबी, आलिया ॲलेने, शमिलिया कोनेल, एफी फ्लेचर, करिश्मा रामहारक