IPL 2025 आधीच RCB चा विराटला मोठा धक्का! ‘या’ खेळाडूकडे सोपवलं कर्णधारपद

[ad_1]

RCB Captain Announcement IPL 2025: इंडियन प्रिमिअर लीगच्या 2025 च्या पर्वाआधीच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला एक मोठा धक्का दिला आहे. आज संघाने यंदाच्या पर्वासाठी कर्णधार कोण असेल याची घोषणा केली असून विराटला डावलण्यात आलं आहे. आज आरसीबीने आपल्या संघाचा नवा कर्णधार रजत पाटीदार असेल असं जाहीर केलं आहे.

मागील वर्षीच दिलेली कल्पना

मागील वर्षीच रजत पाटीदारला आरसीबीच्या व्यवस्थापनाने ‘तयार राहा’ असं सांगत भविष्यात नेतृत्व म्हणून तुझा विचार केला जाईल असे संकेत दिले होते. स्थानिक क्रिकेटमध्ये रजत पाटीदार हे अत्यंत महत्वाचं नाव असून त्याच्याकडे उत्तम नेतृत्व गुण असलेला खेळाडू म्हणून पाहिलं जातं. रजत पाटीदारने सय्यद मुस्ताक अली चषक स्पर्धेमध्ये मध्य प्रदेशच्या संघाचं नेतृत्व केलं होतं. अंतिम सामन्यामध्ये मध्य प्रदेशचा संघ मुंबईविरुद्ध पराभूत झालेला.

संघातूनच कर्णधार होणार हे निश्चित होतं

फॅफ ड्युप्लेसीसला आरसीबी व्यवस्थापनाने करारमुक्त केल्यानंतर मेगा ऑक्शनमध्ये कोणत्याही मोठ्या खेळाडूवर बोली लावली नाही. त्यामुळे आता संघाकडे असलेल्या खेळाडूंमधूनच कर्णधार निवडला जाणार हे लिलावानंतर स्पष्ट झालं होतं. विराट कोहलीने 2013 ते 2021 दरम्यान आरसीबीचं नेतृत्व केलं आहे.  विराटच्या नेतृत्वाखाली आरसीबीचा संघ 2016 च्या पर्वात अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता. मात्र हा सामना आणि चषक सनरायझर्स हैदराबादच्या संघाने जिंकला होता. विराटनंतर कर्णधार झालेल्या फॅफ ड्युप्लेसीसलाही संघाचं नशीब पालटता आलं नाही. आता रजतला तरी हे जमतं का पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

तीन फायनल खेळले पण एकदाही यश नाही

आरसीबीने 2009, 2011 आणि 2016 साली आयपीएलची फायनल खेळली आहे. मात्र एकदाही आरसीबीला जेतेपदावर नाव कोरता आलेलं नाही. 

हा आरसीबीचा आठवा कर्णधार

रजतपूर्वी राहुल द्रविड, डॅनिअल व्हिक्टोरी, शेन वॉट्सन, विराट कोहली, फॅफ ड्युप्लेसीस, शेन वॉट्सन आणि अनिल कुंबळे या सात खेळाडूंनी आतापर्यंत आरसीबीचं कर्णधारपद भूषवलं आहे.

आरसीबीच्या 2025 च्या पर्वातील संघाची संपूर्ण यादी – 

रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, यश दयाल, लियाम लिव्हिंगस्टोन, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, रसिक दार, सुयश शर्मा, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, स्वप्नील सिंग, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, नुवान तुषारा, मनोज भंडगे, जेकब चक्की, कृणाल पंड्या. लुंगी एनगिडी, अभिनंदन सिंग, मोहित राठी.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *