पंजाब किंग्सने पाकिस्तानातून बोलावला खेळाडू, IPL 2025 मध्ये खेळणार बाबर आझमचा टीममेट

[ad_1]

IPL 2025 : आयपीएल 2025 ही स्पर्धा आता हळूहळू फायनलच्या दिशेने वाटचाल करत असून त्यामधील सामन्यांचा रोमांच आता अधिकच वाढला आहे. पंजाब किंग्सचा (Punjab Kings) फलंदाज ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) हा बोटाला झालेल्या फ्रॅक्चरमुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे. आता पंजाब किंग्सने मॅक्सवेलची रिप्लेसमेंट म्हणून थेट पाकिस्तानमध्ये खेळणाऱ्या खेळाडूला आयपीएलमध्ये खेळण्यासाठी बोलावलं आहे. मॅक्सवेलची रिप्लेसमेंट म्हणून पंजाब किंग्सने पाकिस्तान सुपर लीगमध्ये बाबर आझमच्या संघात खेळणाऱ्या खेळाडूला करारबद्ध केलं आहे. 

3 कोटी रुपयांना केलं करारबद्ध : 

पंजाब किंग्सने आयपीएल 2025 मध्ये ग्लेन मॅक्सवेलची रिप्लेसमेंट म्हणून ऑस्ट्रेलियाचा  मिचेल ओवनला करारबद्ध केलं आहे. मिचेल ओवन हा सध्या पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळत आहे. बाबर आझम नेतृत्व करत असलेल्या पेशावर जाल्मी या संघाकडून खेळतोय. आयपीएल २०२५ साठी पंजाबने त्याला 3 कोटी रुपयांना करारबद्ध केलं. 

PSL संपल्यावर IPL मध्ये होणार सहभागी : 

साऊथ आफ्रिकेच्या कॉर्बिन बॉशने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स सोबत खेळण्यासाठी पाकिस्तान सुपर लीगचं कॉन्ट्रॅक्ट तोडलं होतं. तेव्हा मिचेल ओवनने त्याला रिप्लेस केलं होतं. ईएसपीएनक्रिकइन्फोनुसार ओवन हा पाकिस्तान सुपर लीग संपल्यावरच आयपीएलमध्ये खेळेल. 18 मे रोजी पाकिस्तान सुपर लीगची फायनल आहे. अजून पाकिस्तान सुपर लीगमध्ये मिचेल ओवन खेळत असलेल्या पेशावर जाल्मी संघाचे तीन ग्रुप स्टेज सामने शिल्लक आहेत. 

हेही वाचा : CSK VS RCB : अंपायरने धोनीची बॅट ठरवली अवैध, मग CSK च्या कर्णधाराने जे केलं ते पाहून सर्वच थक्क, Video

 

मिचेल ओवनची कामगिरी : 

बिग बॅश लीग 2024-25 मध्ये ओवनने सर्वाधिक धावा केल्या होत्या. होती. 453 धावा आणि  200 हून अधिक स्ट्राइक रेटने होबार्ट हैरिकंसला प्रथमच चॅम्पियन बनविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका ओवनने बजावली होती. वर्षाच्या सुरूवातीस ओव्हनने बीबीएलमध्ये दोन शतके केली. मिचेल ओवेनने 34  टी 20  सामने खेळले असून त्यात 646 धावा केल्या आहेत. यात दोन शतकांचा समावेश असून त्याचा सर्वोत्तम स्कोअर 108 धावा आहे. ओवनने पाकिस्तान सुपर लीगमध्ये यंदा 200  धावा केल्या असून दोन विकेट सुद्धा घेतल्या आहेत. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *