[ad_1]
India vs Pakistan, Cricketers Reaction on Operation Sindoor: पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं उत्तर म्हणून भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ला केला. भारतीय सशस्त्र दलांनी बुधवारी सकाळी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. यामध्ये पाकव्याप्त काश्मीर (POK) मध्ये, भारतीय सैन्याने लष्करी कारवाई करत एकूण नऊ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली. हा हल्ला पहलगाम हल्ल्यानंतर अगदी १५ दिवसांनंतर ही कारवाई करण्यात आली. आता या ऑपरेशन नंतर देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर, भारतीय क्रिकेट संघाच्या क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत आनंद आणि भारतीय सेनेचे कौतुक केले आहे.
काय म्हणाले क्रिकेटर्स?
भारतीय क्रिकेट संघाचे माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, “धर्मो रक्षा रक्षिता जय हिंद की सेना!”. वीरेंद्रचा ही पोस्ट देशाच्या लष्करी सामर्थ्याबद्दल अभिमान दर्शवते. पहलगाम हल्ल्यानंतर वीरेंद्रनेही त्याचा तीव्र निषेध केला होता. आता या कारवाईनंतर त्यांनी भारतीय सैन्याचे कौतुक केले आहे.
हे ही वाचा: भारताच्या हल्ल्यामुळे क्रिकेट विश्वातही भीतीच वातावरण, PSL सोडून पळणार आंतरराष्ट्रीय खेळाडू?
Dharmo Rakshati Rakshata
Jai Hind ki Sena #OperationSindoor
— Virrender Sehwag (@virendersehwag) May 7, 2025
या हल्ल्यावर तरुण क्रिकेटपटू वरुण चक्रवर्तीनेही प्रतिक्रिया दिली आहे. त्यानेही भारतीय सैन्याचे कौतुक केले. इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करून त्याने ऑपरेशन सिंदूरचे कौतुक केले आहे.
Varun Chakravarthy Instagram story for Operation Sindoor. pic.twitter.com/4MDO1rNQx2
— Tanuj (@ImTanujSingh) May 7, 2025
एवढंच नाही तर त्याच्यासोबतच माजी खेळाडू सुरेश रैनानेही भारतीय सैन्याच्या धाडसाचे कौतुक केले आहे.
#OperationSindoor #JaiHind pic.twitter.com/JCkgzlDZ3k
— Suresh Raina(@ImRaina) May 7, 2025
दरम्यान, लखनऊ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका यांनीही ऑपरेश सिंदूरवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले, ‘दहशतवाद कधीही जिंकणार नाही. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारत दृढ आणि एकजूट आहे. आमच्या शूर सशस्त्र दलांना सुरक्षितता आणि यश मिळो अशी शुभेच्छा.’ #Operation Sindoor
Terror will never triumph. India stands resolute and united in the fight against terrorism. Wishing safety and success for our brave armed forces. #OperationSindoor pic.twitter.com/GklIAljc9f
— Dr. Sanjiv Goenka (@DrSanjivGoenka) May 7, 2025
क्रिकेटचा देवता भारतचा माजी स्टार खेळाडू सचिन तेंडुलकरने लिहिले की, ‘एकतेत निर्भय. शक्ती मध्ये अमर्यादितता. भारताची ढाल म्हणजे त्यांचे लोक. या जगात दहशतवादाला स्थान नाही. आम्ही एक संघ आहोत! जय हिंद.’
Fearless in unity. Boundless in strength. India’s shield is her people. There’s no room for terrorism in this world.
Jai Hind #OperationSindoor
— Sachin Tendulkar (@sachin_rt) May 7, 2025
भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर हे रात्री 2 वाजताच्या सुमारास केले. यामध्ये कमीत कमी 30 दहशतवाद्यांचा खात्मा झाला असून पाकिस्तानात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. भारत सरकारने स्पष्ट केले आहे की या कारवाईत फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना लक्ष्य करण्यात आले होते आणि कोणत्याही पाकिस्तानी नागरिक किंवा लष्करी संरचनेला नुकसान झाले नाही.
[ad_2]
Source link