[ad_1]
Operation Sindoor : 7 मे रोजी भारतीय लष्कराच्या वतीनं सैन्यदल आणि वायुदलानं संयुक्तरित्या ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) ही मोहिम हाती घेत यशस्वीरित्या पाकिस्तानातील दहशतवादी तळ उध्वस्त केले. यानंतर भारत – पाकिस्तान यांच्यातील वातावरण खराब झालं असून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानने देखील भारताच्या हल्ल्यानंतर सीमा भागात हल्ल्याचा प्रयत्न केला होता. मात्र हा हल्ला भारताने परतावून लावला, मात्र या दरम्यान भारताने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचं प्रसिद्ध रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम उध्वस्त झालं आहे.
An Indian drone has hit Rawalpindi Cricket Stadium. The stadium is hosting the PSL tournament, where Peshawar and Karachi will be playing tonight at 8:00 PM. pic.twitter.com/MNwoh1kwbl
— Ihtisham Ul Haq (iihtishamm) May 8, 2025
पाकिस्तानात पाकिस्तान सुपर लीग 2025 सुरु आहे. या टी 20 लीगचा सामना आज रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर होणार होता, मात्र भारताच्या ड्रोन हल्ल्यात रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम उद्धवस्त झाल्याने आज होणारा PSL चा सामान रद्द झाला आहे. PSL मध्ये आज पेशावर झालमी विरुद्ध कराची किंग्स यांच्यात सामना होणार होता. रात्री 8: 30 या सामन्याला सुरुवात होणार होती मात्र आता हा सामना रद्द करण्यात आला आहे.
[ad_2]
Source link