[ad_1]
Operation Sindoor : 7 मे रोजी भारतीय लष्कराच्या वतीनं सैन्यदल आणि वायुदलानं संयुक्तरित्या ऑपरेशन सिंदूर ही मोहिम हाती घेत यशस्वीरित्या पाकिस्तानातील दहशतवादी तळ उध्वस्त केले. यावेळी अतिशय नियोजित आणि केंद्रीत असे हल्ले पाकिस्तानी तळांवर करण्यात आले. मात्र या हल्ल्यानंतर आता पाकिस्तान आणि भारतामध्ये युद्धजन्य परिस्थती निर्माण झाली असून 8 मे रोजी सायंकाळपासून पाकिस्तानकडून भारताच्या विविध भागांमध्ये हल्ले करण्यात येत आहेत. आयपीएल 2025 मध्ये आज 58 वा सामना हा धर्मशाला स्टेडियमवर खेळवण्यात येत होता. मात्र पाकिस्तानच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर धर्मशाला येथील HPCA मैदानावर ब्लॅकआऊट करण्यात आलं आहे.
पाकिस्तानच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर धर्मशाला येथील HPCA मैदानावर पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना थांबवण्यात आला आहे. मैदानातील सर्व फ्लडलाइट्स बंद करण्यात आल्या आहेत आणि सर्व प्रेक्षकांना बाहेर काढले जात आहे.
[ad_2]
Source link