[ad_1]
Virendra Sehawag : भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी रात्री जम्मू सह भारताच्या विविध शहरांमध्ये ड्रोन आणि मिसाईल हल्ले केले. त्यांनी पठाणकोटच्या एअरबेसवर सुद्धा अटॅक केला. पाकिस्तानी सैन्याच्या निशाण्यावर भारतीय सैन्याचे बेस होते. त्यानंतर भारताने एअर डिफेन्स सिस्टम S400 ला ऍक्टिव्ह करून पाकिस्तानचे 8 मिसाईल आणि अनेक ड्रोन्स हवेतच नष्ट केले. पाकिस्तानच्या या हल्ल्यानंतर भारताने सुद्धा पाकिस्तानच्या प्रमुख शहरांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. भारत – पाकिस्तान युद्ध सुरु असताना भारताचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग याने पाकिस्तानला इशारा दिला आहे.
माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने ट्विट करत म्हंटले की, ‘पाकिस्तानला शांत राहण्याची संधी असताना त्यांनी युद्ध निवडले आहे. ते त्यांच्या दहशतवादी संपत्तीचे रक्षण करण्यासाठी पुढे आले होते, आणि त्यांच्याबद्दल खूप काही बोलत होते. आपले सैन्य सर्वात योग्य पद्धतीने प्रत्युत्तर देईल, अशी पद्धत जी पाकिस्तान कधीही विसरणार नाही’.
22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाम भागात दहशतवाद्यांनी 26 निष्पाप पर्यटकांवर हल्ले केले. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी 7 मे रोजी भारतीय लष्कराच्या वतीनं सैन्यदल आणि वायुदलानं संयुक्तरित्या ऑपरेशन सिंदूर ही मोहिम हाती घेत यशस्वीरित्या पाकिस्तानातील दहशतवादी तळ उध्वस्त केले. यावेळी अतिशय नियोजित आणि केंद्रीत असे हल्ले पाकिस्तानी तळांवर करण्यात आले. या ऑपेरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानातील 4 आणि जम्मू काश्मीरमधील 5 म्हणजेच एकूण 9 आतंकवादी ठेक्यांना लक्ष केलं आणि त्यांना उध्वस्त केलं. ज्यात लश्कर-ए-तैयबा आणि जैश- ए- मोहम्मद यांच्या दहशतवादी टाळ्यांचा तळांचा सुद्धा सहभाग होता.
हेही वाचा : भारताच्या हल्ल्यात रावळपिंडी स्टेडियम उद्ध्वस्त! आज होणार होती PSL ची मॅच
8 मे च्या पहाटे ऑपरेशन सिंदूरचा बदल घेण्यासाठी पाकिस्तानने भारताच्या 4 राज्यांमधील 15 शहरांवर मात्र हे हल्ले भारताने यशस्वीपणे परतवून लावले. जम्मू काश्मीर, पंजाब, गुजरात आणि राजस्थान ही राज्ये पाकिस्तानच्या रडारवर होती. भारतीय सशस्त्र दलांनी 8 मे च्या सकाळी पाकिस्तानमधील लाहोर सह अनेक ठिकाणचं हवाई संरक्षण रडार आणि प्रणालीला लक्ष्य केलं. तसंच लाहोरची हवाई संरक्षण प्रणाली भारतीय सैन्यानं निष्प्रभ केली. भारताकडून हॅरोप ड्रोनचा वापर करण्यात आला. या ड्रोन हल्ल्यात रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम उद्ध्वस्त झालं. यानंतर सुद्धा वीरेंद्र सेहवागने पाकिस्तानला उद्देशून ट्विट केलं. त्यांनी म्हंटले की, ‘जर कोणी तुमच्यावर दगड फेकत असेल तर तुम्ही त्याच्यावर फुल टाका पण कुंड्यांसकट. जय हिंद!’ . तसेच अजून एक ट्विट करत त्याने ‘धर्मो रक्षति रक्षत: जय हिंद की सेना’ असं देखील लिहिलं. वीरेंद्र सेहवागच्या या ट्विटवर नेटकरी विविध प्रक्रिया देत आहेत.
[ad_2]
Source link