‘पाकिस्तानातील दहशतवाद्यांना…’ ऑस्ट्रेलियाच्या स्टार क्रिकेटरने केलं भारतीय सेनेचं कौतुक

[ad_1]

IPL 2025 : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्लयापासून भारत – पाकिस्तान (India VS Pakistan) यांच्यात तणावाचं वातावरण आहे. भारत – पाक यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीत पाकिस्तानी सैन्य वारंवार भारतावर हल्ले करण्याचा प्रयत्न करतायत, तर भारतीय सैन्य त्यांना चोख उत्तर देतंय. भारतीय सैन्याने पहलगामचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानातील 9 दहशतवादी स्थळांवर हल्ले केले. भारतीय सैन्याच्या या पराक्रमानंतर संपूर्ण जगभरात त्यांचं कौतुक केलं जात आहे. आयपीएल 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा भाग असणारा ऑस्ट्रेलियाचा स्टार क्रिकेटर जोश हेजलवुड (Josh Hazlewood) हा याने शुक्रवारी भारतीय सेनेच्या समर्थनार्थ एक पोस्ट केली. यात त्याने भारतीय सैन्यदलाचं कौतुक केलंय. 

तुम्ही महान आहात : 

ऑस्ट्रेलियाचा स्टार क्रिकेटर जोश हेजलवुड याने सोशल मीडियावर पोस्ट करून लिहिले की, ‘ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू म्हणून मी नेहमीच कोणत्याही आव्हानाविरूद्ध दृढ उभे राहण्याच्या भावनेवर विश्वास ठेवला आहे, ज्याप्रमाणे आमची शूर भारतीय सशस्त्र सेना पाकिस्तानमधील दहशतवाद्यांविरूद्ध लढा देत आहेत. मला भारताच्या सैनिकांना सांगायचे आहे की तुम्ही नक्कीच महान आहात. आपले धैर्य, त्याग आणि आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी अतूट वचनबद्धता माझ्यासह कोट्यावधी लोकांना प्रेरणा देते’.

हेही वाचा : MS Dhoni भारतीय सैन्यात आहे ‘या’ पदावर, त्याला किती पगार मिळतो माहितेय? जाणून घ्या

 

मी तुमचं समर्थन करतो : 

जोश हेजलवुडने आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, ‘दररोज शांती आणि ऐक्याच्या मूल्यांचे रक्षण करताना धैर्य आणि दृढनिश्चयाने आपल्याला अडथळ्यांचा सामना करावा लागतो. कारण हे जाणून घेणं गरजेचं आहे की आपला लढा केवळ भारतासाठीच नाही तर सुरक्षित जगाच्या अपेक्षेसाठी आहे. आम्ही ऑस्ट्रेलियन लोक तुमच्या लवचिकतेचे कौतुक करतो आणि मी केवळ क्रिकेटपटू म्हणून नव्हे तर योग्यतेसाठी उभे राहण्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवणारी एक व्यक्ती म्हणून देखील प्रोत्साहित करीत आहे. मजबूत रहा, सुरक्षित रहा आणि हे जाणून घ्या की जगभरातील तुमचे साथी तुमचे समर्थन करीत आहेत’. 

भारत – पाक तणावामुळे आयपीएलला स्थगिती : 

भारत – पाकिस्तान यांच्यातील तणाव परिस्थितीमुळे आयपीएल 2025 ही स्पर्धा एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात येत असल्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे आयपीएल खेळण्यासाठी भारतात आलेले काही विदेशी खेळाडू हे पुन्हा आपल्या मायदेशात परतले आहेत. आयपीएल 2025 चं पुढील वेळापत्रक कसं असणार? स्पर्धा भारतात खेळवली जाणार की विदेशात इत्यादी विषयी माहिती बीसीसीआयकडून येत्या काही दिवसात येण्याची शक्यता आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *