Imran Khan News: इम्रान खान यांची तुरुंगात हत्या? पाकिस्तान सरकारने काय म्हटलंय जाणून घ्या

[ad_1]

Imran Khan Death Fact Check: 10 मे रोजी संध्याकाळी भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी कारवाई थांबवत युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. पण भारतासोबतच्या चार दिवसांच्या युद्धात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. भारताने दमदार कामगिरी करत पाकिस्तानातील अनेक दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. याशिवाय यामध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचीही चर्चा आहे. दरम्यान  पाकिस्तानमधून एक मोठी बातमी येत आहे. या बातम्यांनुसार असा दावा केला जात आहे की पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि 1992 च्या विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार इम्रान खान यांचे निधन झाले आहे. मृत्यूचा दावा करणारे इम्रान खानचे फोटो आणि त्यांच्या मृत्यूशी संबंधित एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. सोशल मीडियावर ही बातमी वाऱ्यासारखी पसरू लागली आहे. व्हायरल पोस्टमधून असे म्हंटले जात आहे की आयएसआय आणि पाकिस्तानी रेंजर्सनी तुरुंगात इम्रान खानची हत्या केली आहे. पण नक्की काय सत्य आहे हे जाणून घेऊयात… 

ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील ज्या 9 ठिकाणी ड्रोन हल्ले केले होते त्यामध्ये रावळपिंडीचाही समावेश होता. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली रावळपिंडीतील आदियाला या तुरुंगात आहेत. त्यामुळे त्यांचा तुरुंगातच मृत्यू झाला आहे असे वृत्त आहे. 

हे ही वाचा: ‘या’ तारखेपासून पुन्हा सुरू होणार IPL 2025, BCCI करणार नवीन वेळापत्रक जाहीर करणार

 

शनिवारी, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेली एक प्रेस रिलीज व्हायरल झाली, ज्यामध्ये खानचा ‘रहस्यमय परिस्थितीत मृत्यू झाला’ असे म्हटले होते. अधिकृत सरकारी पत्रासारखे दिसणाऱ्या या व्हायरल झालेल्या कागदपत्रात, असा दावा करण्यात आला आहे की इम्रान खानचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत झाला आणि पारदर्शक चौकशीचे आश्वासन दिले आहे. असे या पत्रात होते. 

हे ही वाचा: MS Dhoni भारतीय सैन्यात आहे ‘या’ पदावर, त्याला किती पगार मिळतो माहितेय? जाणून घ्या

 

याआधी सोशल मीडियावर इम्रान खानचा एक फोटो व्हायरल होऊ लागला होता. त्या फोटोमध्ये त्यांच्या डोक्यातून रक्त वाहत असल्याचे दिसून येत होते. त्या फोटोवरून सोशल मीडियावर असा दावा केला जाऊ लागला की इम्रान खान यांचे निधन झाले आहे आणि त्यांना रुग्णालयात आणण्यात आले आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर वेगाने पसरली, ज्यामुळे दहशत आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

हे ही वाचा: चेहऱ्यावर शांती आणि आनंद… धर्मशाळेहून वंदे भारत ट्रेनने सुरक्षित परतला पंजाब आणि दिल्लीचा संघ, खेळाडूंचा Video Viral

 

काय आहे सत्य?

एवढ्या सगळ्या गोष्टी व्हायरल झाल्यावर असा प्रश्न पडतो की हे खरे आहे का? तर यामध्ये काहीही सत्यता नाही. व्हायरल झालेला फोटो हे  तथापि, या अफवा जुन्या व्हिडीओ क्लिपमधले आहेत. तसेच ती सरकारी प्रेस नोटही बनावट असल्याचे समजत आहे. फॅक्ट चेकने आणि अनेक स्वतंत्र स्त्रोतांनी या बातमीला  पूर्णपणे खोडून काढले आहेत. व्हायरल झालेला फोटो हा 2013 सालच्या व्हिडीओ क्लिपमधील आहे. त्यावेळी लाहोरमध्ये निवडणूक रॅली सुरु होती त्याचदरम्यान फोर्कलिफ्टवरून पडून इम्रान खान जखमी झाले होते. त्यातील फोटो आता व्हायरल होत आहेत आणि असा दावा केला जात आहे की खानला कोठडीत मारण्यात आले किंवा त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *