विराट कोहलीच्या निवृत्तीवर गौतम गंभीरची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाला ‘तुला…’

[ad_1]

Gautam Gambhir on Virat Kohli Retirement: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने कसोटीमधून निवृत्ती जाहीर करत क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. रोहित शर्माने निवृत्ती घेतल्यानंतर विराट कोहलीनेही निवृत्तीचे संकेत दिले होते. यानंतर बीसीसीआय त्याची मनधरणी करत निवृत्ती माघार घेण्यासाठी प्रयत्न करत होतं. पण विराट कोहली निवृत्तीच्या निर्णयावर ठाम होता आणि अखेर त्याने इंस्टाग्रामला पोस्ट शेअर करत घोषणा केली आहे. मात्र रोहित शर्मापाठोपाठ विराट कोहलीनेही निवृत्ती घेतल्याने भारतीय संघात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. 

विराट कोहलीने कसोटीमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर क्रिकेट विश्वातून प्रतिक्रिया उमटत आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरनेही एक्सवर पोस्ट शेअर सिंहासारखं पॅशन असणारा माणूस असं कौतुक केलं आहे. तसंच चिकू तुझी आठवण येत राहील असंही म्हटलं आहे. 

“सिंहासारखा पॅशन असणारा माणूस! चिकू तुझी आठवण येत राहील,” असं गौतम गंभीरने पोस्टमधये म्हटलं आहे. 

जय शाह यांची पोस्ट

“एका उत्तम कसोटी कारकिर्दीबद्दल तुझं अभिनंदन! टी-20 क्रिकेटचा उदय होत असताना कसोटीचं समर्थन केल्याबद्दल आणि शिस्त, तंदुरुस्ती आणि वचनबद्धतेचं एक असाधारण उदाहरण मांडल्याबद्दल धन्यवाद. लॉर्ड्सवरील तुझ्या भाषणाने सर्व काही सांगितल आहे. तू मनापासून, धैर्याने आणि अभिमानाने कसोटी खेळलास,” असं आयसीसीचे अध्यक्ष जय शाह म्हणाले आहेत. 

विराट कोहलीने निवृत्ती जाहीर करणाऱ्या पोस्टमध्ये काय म्हटलं आहे?

“कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा मी पहिल्यांदा बॅगी ब्लू रंगाचा पोशाख घातला होता त्याला 14 वर्षे झाली. खरं सांगायचं तर, या फॉरमॅटमध्ये मला असा प्रवास करावा लागेल याची मी कधीच कल्पनाच केली नव्हती. या फॉरमॅटने माझी खरी परीक्षा घेतली, मला घडवले आणि आयुष्यभर मी जे धडे सहन करेन असे धडे कसोटी क्रिकेटने शिकवले,” असं विराटने इन्स्टाग्रामवर निवृत्ती जाहीर करणाऱ्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

“पांढऱ्या रंगाच्या जर्सीत क्रिकेट खेळण्यात काहीतरी खास खोलवर रुझलेले वैयक्तिक गुण असतात. शांतपणे खेळणे, लांबलचक दिवस, छोटे छोटे पण महत्त्वाचे क्षण जे कोणीही पाहत नाही पण ते कायम तुमच्यासोबत राहतात,” असं विराट कसोटी क्रिकेटच्या आठवणी सांगताना पोस्टमध्ये म्हणाला आहे.

“मी या फॉरमॅटमधून बाहेर पडतोय, हे सोपे नाही – पण हेच मला आता योग्य वाटत आहे. मी माझ्याकडे जे होते ते सर्व काही दिले आहे आणि त्याने मला माझ्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त परत दिले आहे,” असं म्हणथ विराटने कसोटी क्रिकेटप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

“मी कृतज्ञतेनं अन् भरल्या मनाने निघून जातोय ते या खेळासाठी, मी ज्या लोकांसोबत मैदान शेअर केले त्यांच्यासाठी आणि वाटेत मला भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी. मी माझ्या कसोटी कारकिर्दीकडे नेहमी हसतमुखाने पाहत राहीन याची मला खात्री आहे,” असा विश्वास विराटने व्यक्त केली आहे. विराटची कसोटीमधून निवृत्ती हा भारतीय क्रिकेटसाठी मोठा धक्का मानला जात आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *