‘तुला द्यायला माझ्याकडे…’ विराट कोहलीच्या निवृत्तीवर क्रिकेटचा देव झाला भावूक, पोस्ट वाचून डोळे पाणावतील!

[ad_1]

Virat Kohli Retirement: रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहलीने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) ने विराटला या निर्णयाबद्दल पुर्नविचार विचार करण्याची विनंती केली होती. पण त्याने एक पोस्ट लिहून आपण कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. यावर आता क्रिकेटविश्वातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने विराट कोहलीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. काय म्हणाला सचिन तेंडुलकर? सविस्तर जाणून घेऊया. 

काय म्हणाला सचिन?

तू कसोटीतून निवृत्त होत असताना 12 वर्षांपूर्वी माझ्या शेवटच्या कसोटी सामन्यादरम्यान तू केलेल्या विचारशील कृतीची मला आठवण येतेय. तू तुझ्या दिवंगत वडिलांकडून मला एक धागा भेट देण्याची ऑफर दिली होतीस. ती गोष्ट स्वीकारणे माझ्यासाठी खूप वैयक्तिक होते. पण ती कृती हृदयस्पर्शी होती. तेव्हापासून ती वस्तू माझ्यासोबत आहे. माझ्याकडे त्या बदल्यात देण्यासाठी एक धागा नसला तरी तुझ्या कृतीचं खूप कौतुक आणि तुला खूप शुभेच्छा. 

विराट कोहली, तुझा खरा वारसा असंख्य तरुण क्रिकेटपटूंना हा खेळ सुरू ठेवण्यासाठी प्रेरणा देत राहील.

तुझी कसोटी कारकीर्द अविश्वसनीय आहे! तू भारतीय क्रिकेटला धावांपेक्षाही खूप काही दिलंयस. तू भारतीय क्रिकेटला उत्साही चाहते आणि खेळाडूंची एक नवीन पिढी दिलीयस. खूप खास कसोटी कारकिर्दीबद्दल अभिनंदन, असे सचिनने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

कोहलीच्या निवृत्तीचे काय आहे कारण? 

2019 पर्यंत विराट कोहलीचा कसोटीत हात पकडणारं कोणीही न्हवते. 2011 ते 2019 या काळात विराटने 84 सामने खेळले. या सामन्यात त्याने 7202 धावा केल्या. या काळात विराटच्या बॅटमधून एकूण 27 शतकं  झाली.याची सरासरी 54.97 होती. त्यावेळी तो फॅब-4 मध्ये सर्वाधिक शतकं करणारा फलंदाज ठरला होता. पण 2020  पासून विराटच्या कामगिरीत घसरण होऊ लागली. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, रोहित शर्माने कसोटीमधून निवृत्ती घेतल्यानंतर बीसीसीआयकडून विराट नव्हे तर शुभमन गिलला भविष्यातील कर्णधार म्हणून पाहिलं जातय. विराट कोहलीने पुन्हा एकदा भारतीय संघाचं कर्णधारपद भूषवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र बीसीसीआयने यावर कोणताही विचार केला नव्हता. पुढील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा पाहता बीसीसीआयला पूर्णवेळ कर्णधार हवाय. यानंतर विराटने त्याचा विचार पक्का केला आणि आपण कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे बोर्डाला कळवले होते. पण इंग्लंडचा महत्त्वाचा दौरा येत असल्याने बीसीसीआयने त्याला यावर पुन्हा विचार करायला सांगितले होते. त्याने बीसीसीआयच्या विनंतीवर काहीही उत्तर दिले नसल्याचे समजतय. यानंतर आता विराटने थेट सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची पोस्ट शेअर केली.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *