IPL 2025 स्थगितीमुळे मायदेशी गेलेल्या ‘या’ खेळाडूंची परत येण्याची शक्यता कमी, MI मधल्या दोघांचा समावेश

[ad_1]

IPL 2025 Revised Schedule: भारत-पाकिस्तानमधील तणावामुळे स्थगित करण्यात आलेली आयपीएल स्पर्धा 17 मेपासून पुन्हा एकदा खेळवली जाणार आहे. बीसीसीआयने आयपीएलचं नवं वेळापत्रक जारी केलं आहे. त्यानुसार 6 ठिकाणी 17 सामने खेळवले जाणार आहेत. अंतिम सामना 3 जून रोजी खेळवला जाईल.  सुधारित वेळापत्रकात दोन डबल-हेडर सामने समाविष्ट आहेत, जे दोन रविवारी खेळवले जातील. मात्र भारत – पाक तणावात स्थगित झालेल्या आयपीएलमुळे काही विदेशी खेळाडू हे त्यांच्या मायदेशात परतले आहेत. त्यापैकी काही खेळाडू हे आयपीएल सुरु झालं तरी कदाचित पुन्हा भारतात येणार नाही अशी शक्यता आहे. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : 

जोश हेझलवूड या सीजनमध्ये आरसीबीचा सर्वोत्तम गोलंदाज आहे, त्याने संघाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज दुखापतींशी झुंज देत आहे आणि आयपीएलमध्ये खेळून पुन्हा धोका पत्करण्याऐवजी तो पुढील काळात त्याच्या देशासाठी खेळण्याकरता तंदुरुस्त राहण्यावर लक्ष केंद्रित करू शकतो. याव्यतिरिक्त, रोमारियो शेफर्डकडे सुद्धा काही आंतरराष्ट्रीय कमिटमेंट असल्याने आयपीएलपेक्षा तो त्याला जस्ट प्राधान्य देण्याची शक्यता आहे.

मुंबई इंडियन्स: 

मुंबई इंडियन्समधील अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज मुजीब उर रहमान आणि इंग्लंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज रीस टॉपली हे कदाचित पुन्हा भारतात परतणार नाहीत अशी शक्यता आहेत. हे दोघेही नियमित सुरुवात करणारे नसले तरी, त्यांची उपस्थिती एमआयच्या गोलंदाजी युनिटमध्ये पोकळी निर्माण करू शकते. 

दिल्ली कॅपिटल्स :  

मिचेल स्टार्क हा दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजी युनिटचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि आयपीएल २०२५ मध्ये त्याने चांगली कामगिरी केलीये.  मिचेल स्टार्कला दुखापत झाली आहे. तसेच तो आयपीएल स्थगितीमुळे ऑस्ट्रेलियाला परत गेलाय. सध्या फॉर्ममध्ये नसलेला फ्रेझर-मॅकगर्क देखील मायदेशी परतला आहे. त्यामुळे हे दोघेही आयपीएल २०२५ खेळण्यासाठी परत न येण्याचा निर्णय घेऊ शकतात. 

कोलकाता नाईट रायडर्स : 

केकेआर प्लेऑफच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर पडल्यामुळे ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज स्पेन्सर जॉन्सन आणि दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक, हे कदाचित पुन्हा भारतात येणार नाहीत. 

लखनऊ सुपर जाएंट्स : 

लखनऊ सुपर जाएंट्सचा अनुभवी अष्टपैलू मिशेल मार्श देखील आयपीएलच्या उर्वरित सामन्यांसाठी उपलब्ध नसू शकतो. ऑस्ट्रेलियन स्टार खेळाडू वैयक्तिक सुरक्षेच्या कारणास्तव माघार घेऊ शकतो आणि आयपीएलच्या उर्वरित सामन्यांना मुकू शकतो. 

पंजाब किंग्स : 

पंजाब किंग्स दक्षिण आफ्रिकेच्या मार्को जॅन्सनशिवाय उर्वरित सामने खेळू शकते. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन दुखापतीमुळे आधीच स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

राजस्थान रॉयल्स :

जोफ्रा आर्चरने भारतात न परतण्याचा निर्णय घेतल्यास राजस्थानच्या वेगवान गोलंदाजांवर मोठा परिणाम होऊ शकतो.  

सनरायजर्स हैदराबाद : 

हेनरिक क्लासेन (दक्षिण आफ्रिका) आणि पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) हे सनरायजर्स हैदराबाद संघातील दोन प्रमुख परदेशी स्टार खेळाडू कदाचित पुन्हा आयपीएल 2025 चे उर्वरित सामने खेळण्यासाठी भारतात परतणार नाहीत. 

गुजरात टायटन्स : 

 ग्लेन फिलिप्स आधीच स्पर्धेतून बाहेर पडला आहे आणि तो पुन्हा परतणार नाही. तसेच जॉश बटलर हा सुद्धा भारतात परतण्याची शक्यता कमी आहे. 

चेन्नई सुपरकिंग्स : 

न्यूझीलंडचे दोन महत्त्वाचे खेळाडू डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र दुसऱ्या टप्प्यात परत न येण्याचा निर्णय घेऊ शकतात, त्यामुळे सीएसकेला दुहेरी धक्का बसू शकतो. सीएसके आधीच स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे त्याचा त्यांच्यावर फारसा परिणाम होणार नाही.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *