Video : विराटच्या निवृत्तीनंतर ‘कोहली-कोहली’ करत चिअर करताना दिसली अवनीत कौर, दिली FLYING KISS

[ad_1]

Virat Kohli Retirement : भारताचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने 12 मे रोजी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. विराटच्या या निर्णयाने अनेकांना धक्का बसला आहे, जगभरातील अनेक दिग्गज व्यक्तींनी निवृत्तीनंतर विराट कोहली संदर्भात पोस्ट शेअर केल्या तसेच पुढील इनिंगसाठी त्याला शुभेच्छा सुद्धा दिल्या.  अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी सुद्धा विराटबाबत पोस्ट शेअर केल्या. या दरम्यान अवनीत कौरचा (Avneet Kaur) एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात ती शहनाज गिल आणि मुनव्वर फारूकी सह विराटला चिअर करताना दिसतेय.

बॉलिवूड अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुऐंसर अवनीत कौर ही मागील काही दिवसांपासून विराट कोहलीमुळे चर्चेत आली आहे. विराटने इंस्टाग्रामवर अवनीतचे काही फोटो लाईक केले त्यानंतर त्याची खूप चर्चा झाली. ज्यावर नंतर विराटला सोशल मीडियावर स्टोरी शेअर करून खुलासा सुद्धा करावा लागला. मात्र यामुळे अवनीत कौरच्या इंस्टाग्रामवरील फॅन फॉलोअर्समध्ये प्रचंड वाढ झाली. आता विराटच्या टेस्ट क्रिकेटमधील निवृत्तीनंतर अवनीतचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यात ती विराटला चिअर करताना दिसतेय. तसेच हार्ट शेप बनवून फ्लायिंग किस सुद्धा देताना दिसतेय. 

हेही वाचा : IPL 2025 चं नवं वेळापत्रक जाहीर! मुंबई इंडियन्सचे सामने ‘या’ दिवशी होणार

 

पाहा व्हिडीओ : 

एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात अवनीत कौर तिचे मित्र आणि सह कलाकारांसह ‘कोहली, कोहली!’ ओरडताना दिसतेय. तसेच यात ती फ्लायिंग किस आणि हार्ट शेप बनवताना सुद्धा दिसतेय. या व्हिडिओत तिच्या सोबत मुनव्वर फारूकी आणि शहनाज गिल सुद्धा दिसतायत. मात्र व्हिडीओ पाहिल्यावर लक्षात येतंय की हा व्हिडीओ काही दिवसांपूर्वीचा आहे. 

विराटचे फॅन्स अवनीतला करतायत ट्रोल : 

विराट कोहलीचे फॅन्स सोशल मीडियावर अवनीत कौरला ट्रोल करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिले की, ‘विराटच्या घरात भांडण लावून त्याला निवृत्त व्हायला लावलं’. तर अजून एका युजरने लिहिले की, ‘विराटने निवृत्ती घेतली तुझ्यामुळे’. तर एकाने लिहिले, ‘असंच कधी इंडियन आर्मीला सुद्धा चिअर करा’.  



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *