“फक्त तेच लोक टेस्टमध्ये यशस्वी होतात…”: विराट कोहलीच्या निवृत्तीवर अनुष्काची पोस्ट Viral, सोशल मीडियावर चर्चा

[ad_1]

Anushka Sharma’s Emotional Tribute to Virat Kohli: भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने नुकतीच टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. विराटने क्रिकेट कारकिर्दीत गेल्या काही वर्षांत, मैदानावर अनेक अविस्मरणीय क्षण दिले आहेत.  कोहलीने कसोटी क्रिकेट सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. आता त्याची पत्नी  बॉलीवूड अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर एक सुंदर स्टोरी शेअर केली आहे. अनुष्का शर्माने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत त्याचं कौतुक केलं. अनुष्काने लिहिलं, “ते रेकॉर्ड्स आणि आकडे बोलतील, पण मला आठवतील ते अश्रू जे तू दाखवले नाहीस, संघर्ष जे कोणी पाहिले नाहीत, आणि खेळाप्रती तुझं निस्वार्थ प्रेम.”

नक्की काय म्हणाली अनुष्का?

अनुष्काने लिहले आहे की, “म्हणूनच फक्त त्यांनाच टेस्ट क्रिकेटमध्ये यश मिळतं, ज्यांची एक डीप आणि मोठी स्टोरी असते. पिच कसंही असो, गवती, सुकलेलं घरचं किंवा परदेशातलं.” अनुष्काने स्टँडअप कॉमेडियन वरुण ग्रोव्हर यांचा एक कोटही शेअर केला आहे. 

हे ही वाचा: Virat Kohli: टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीवर विराट कोहलीची आली पहिली प्रतिक्रिया, बघा Viral Video

 

“कसा तरी, मी नेहमीच कल्पना केली होती की तू पांढऱ्या रंगात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होशील. पण तू नेहमीच तुझ्या मनाचे ऐकले आहेस.” 

हे ही वाचा: Shami Retirement: “तुम्ही भविष्याचा सत्यानाश केला…” निवृत्तीच्या अफवांवर मोहम्मद शमींचा संताप

 

36 वर्षीय कोहलीने सोमवारी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आणि या खेळाच्या सर्वात लांब फॉरमॅटमध्ये त्याच्या भविष्याबद्दलच्या चर्चाना  पूर्णविराम दिला.

विराटाचे करियर 

विराटने आपल्या 13 वर्षांच्या टेस्ट करिअरमध्ये 123 सामन्यांत 9,230 धावा केल्या. त्याने 30 शतके झळकावली. त्याने याआधीच T20 मधून निवृत्ती घेतली असून आता तो फक्त वनडे क्रिकेट खेळणार आहे.

हे ही वाचा: Imran Khan News: इम्रान खान यांची तुरुंगात हत्या? पाकिस्तान सरकारने काय म्हटलंय जाणून घ्या

 

कोहली आणि अनुष्काचं लग्न 2017 मध्ये झालं होतं. त्यांना वामिका (4वर्षांची) आणि अकाय (15 महिने) अशी दोन मुलं आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *