[ad_1]
IPL 2025: भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे आयपीएल 2025 च्या उर्वरित सामन्यांसाठी नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरित लीग सामने 17 मे पासून सुरू होतील तर अंतिम सामना 3 जून रोजी खेळवला जाईल. असे असले तरी नॉकआउट सामन्यांचे ठिकाण अद्याप जाहीर झालेले नाही. सोमवारी लीगचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले. भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे आयपीएल सामने गेल्या शुक्रवारी आयपीएल एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आले होते.
नवीन वेळापत्रक
आयपीएलच्या सुधारित वेळापत्रकानुसार, बेंगळुरू आणि कोलकाता यांच्यातील सामना 17 मे रोजी बेंगळुरूमध्ये खेळवला जाणार आहे. तर लीग टप्प्यातील शेवटचा सामना लखनऊ आणि बेंगळुरू यांच्यात लखनऊमध्ये खेळला जाईल. जयपूरमध्ये लीग सामना होणार नाही असा अंदाज आधी लावला जात होता. पण बोर्डाने निवडलेल्या 6 शहरांमध्ये जयपूरचा समावेश आहे. आयपीएल 2025 चे उर्वरित सामने बेंगळुरू, जयपूर, दिल्ली, लखनऊ, मुंबई आणि अहमदाबाद येथे खेळवले जातील.
प्लेऑफचे ठिकाण नंतर जाहीर करणार
क्वालिफायर 1 ही 29 मे रोजी खेळवला जाणार आहे. तर एलिमिनेटर 30 मे रोजी होईल. दुसरा क्वालिफायर 1 जून रोजी खेळवला जाईल आणि अंतिम सामना 3 जून रोजी खेळवला जाईल. असे असले तरी प्लेऑफ सामन्यांचे ठिकाण अद्याप जाहीर झालेले नाही.
आयपीएलकडून सुधारित वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली. टाटा आयपीएल 2025 पुन्हा सुरू होतेय. सरकार, सुरक्षा संस्था आणि सर्व प्रमुख पार्टनरशी व्यापक चर्चा केल्यानंतर बोर्डाने उर्वरित हंगाम पुढे सुरु ठेवण्याचा निर्णय घेतलाय, असे यावेळी सांगण्यात आले. 17 मे 2025 पासून सुरू होणारे आणि 3 जून रोजी अंतिम फेरीत संपणारे एकूण 17 सामने 6 ठिकाणी खेळवले जाणार आहेत.
[ad_2]
Source link