Motorola Edge 50 Neo: फ्लिपकार्टवर सध्या बिग बिलियन डेज सेल सुरु झालाय. येथे तुम्हाला अनेक गॅझेट्स खूप कमी किंमतीत मिळणार आहेत. फोन, टीव्ही, लॅपटॉपसारख्या वस्तू कमी किंमतीत घेऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही मोठी संधी आहे. सॅमसंग, गुगल पिक्सलचे काही फोन अर्ध्याहून कमी किंमतीत मिळतायत. मोटोरोलाचा फोनदेखील कमी किंमतीत मिळतोय. या ऑफर्सबद्दल जाणून घेऊया.
मोटोरोला एज 50 नियो भारतात गेल्यावर्षी लॉन्च झाला. हा फोन पहिल्यांदाच सेलमध्ये उपलब्ध होतोय. ग्राहकांना फ्लिपकार्टवर दुपारी 12 वाजल्यापासून हा फोन घेता येणार आहे. फ्लिपकार्टवरील बॅनरनुसार हा फोन 22 हजार 999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीवर खरेदी केला जाऊ शकतो. ग्राहकांना ईएमआयवर फोन घेण्याची संधीदेखील आहे. यासाठी तुम्हाल दरम्हा 3 हजार 583 रुपये ईएमआय भरावा लागेल. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल स्पेशल अंतर्गत हा फोन स्वस्तात घेण्याची संधी आहे. ग्राहकांनी एचडीएफसी कार्डवरुन शॉपिंग केल्यास तुम्हाला यावर 10 टक्क्यांचा डिस्काऊंटदेखील मिळेल.
डिस्प्ले
मोटोरोला एज 50 नियोमध्ये 6.4 इंचचा 1.5k (2670 x 1220 पिक्सल) pOLED LTPO डिस्प्ले देण्यात आलाय. यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 3 निट्स पीक ब्राइटनेस मिळतो. स्क्रिनच्या प्रोटेक्शनसाठी फोनलाा गोरिला ग्लास 3 सह बाजारात लॉन्च करण्यात आलंय.
सॉफ्टवेयर
मोटो एज 50 नियो हा फोन आउट ऑफ द बॉक्स हेलो UI के साथ एंड्रॉयड सॉफ्टवेयरवर काम करतोय. कंपनीकडून तुम्हाला 5 वर्षांपर्यंत ओएस आणि सिक्योरिटी अपडेट दिले जाणार आहे.
68वॉल्ट चार्जिंग
स्मार्टफोन मीडियाटेक डायमेंशन 7300 चिपसेट द्वारे LPDDR4x रॅम आणि UFS 3.1 स्टोरेजसह काम करतो.पॉवरसाठी नवा मोटोरोला फोन 68W वायर्ड फास्ट आणि 15w वायरलेस चार्जिंगसह 4 हजार 310mAhची बॅटरी दिली जातेय.
कॅमेरा
मोटो एज 50 नियोचा कॅमेरादेखील खूप खास आहे. ऑप्टीकल स्टेबिलायजेशन (OIS) सह 50 मेगापिक्सलचा सोनी LYTIA 700C प्राइमरी कॅमरा, 13 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड/मॅक्रो कॅमेरा आणि मागे 3x ऑप्टीकल झूमसह 10 मेगापिक्सलचा टेलीफोटो लेंस मिळते. मोटोरोला एड्ज 50 नियो फोनमध्ये तुम्हाला सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतोय.
कनेक्टिव्हिटी
कनेक्टिव्हिटीसाठी एज 50 मध्ये डॉल्बी एटमॉस, एनएफसी, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि इन डिस्प्ले फिंगरप्रिंटसह ड्युयल स्पीकरदेखील देण्यात आला आहे.