Jio आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडणार, दिवाळी धमाका ऑफरमध्ये वर्षभर फ्री मिळणार ‘ही’ सुविधा


Reliance Jio Diwali Dhamaka Offer: रिलायन्स जिओने फ्री सीम कार्ड, काँलिंग देऊन टेलिकाँम क्षेत्रात क्रांती घडवून आणली होती. यानंतर जिओकडून सर्वसामान्य ग्राहकांना परवडणारे बजेट फ्रेण्डली रिचार्ज ऑफर केले जातात. तसेच अनेकवेळा ऑफर्सदेखील ठेवल्या जातात. पण जिओची दिवाळी धमाका ऑफर थोडी खास आहे. कारण यामध्ये तुम्हाला 1 वर्षासाठी जिओचे सब्सस्क्रिप्शन मिळणार आहे. या ऑफरमुळे जिओच्या ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. काय आहे ही ऑफर? याचा ग्राहकांना कसा होणार फायदा? सविस्तर जाणून घेऊया. 

गणेशोत्सव संपला आता नवरात्रोत्सवानंतर दिवाळी कधी येऊन जाईल कळणार नाही. दिवाळीसाठी काही दिवस शिल्लक आहेत.दिवाळीसाठी अनेक कंपन्यांनी वेगवेगळ्या ऑफर्स आणायला सुरुवात केली आहे. आता रिलायन्स जिओने जियो फायबरची नवी ऑफर आणली आहे. याअंतर्गत नव्या आणि सध्याच्या अशा दोन्ही ग्राहकांना एक वर्षाची मोफत सदस्यता मिळणार मिळवण्याची संधी मिळणार आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला रिलायन्स डिजिटल स्टोर्सकडून खरेदी करावी लागेल. किंवा विेशेष रिचार्ज प्लान निवडावा लागेल. 

 नवे एअरफायबर कनेक्शन 

नवे जिओ एअर फायबर ग्राहक पुढे देण्यात आलेल्या पद्धतीने एक वर्षाची सदस्यता फ्रीमध्ये मिळवू शकतात.कोणत्याही रिलायन्स डिजिटल किंवा माय जिओ स्टोअरहून स्मार्टफोन, घरगुती उपकरण किंवा इतर इलेक्ट्राँनिक्स सारख्या वस्तूंवर सूट मिळणार आहे. यासाठी 20 हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त खरेदी करावी लागेल. 
दिवाळी विशेष ऑफरमध्ये नवे एअरफायबर कनेक्शन निवडण्याची सुविधा असेल, ज्याची किंमत 2,222 रुपये इतकी असेल. 

फ्री प्लान ऑफर

सध्याचे ग्राहक या ऑफरमध्ये जिओ एअर फायबरचे ग्राहकदेखील 2 हजार 222 रुपयांचा विशेष 3 महिन्यांचा प्लान करुन एक वर्षापर्यंत मोफत ऑफरचा लाभ घेऊ शकतात. नव्या रिचार्जवर ग्राहकांना प्रत्येक महिन्याला 12 कूपन मिळतील. जे त्यांच्या सक्रिय एअरफायबर प्लानच्या किंमतीएवढे असतील. नोव्हेंबर 2025 आणि ऑक्टोबर 2025 दरम्यान हे कूपन वैध असतील. यासाठी तुम्हाला 15 हजार रुपयांहून अधिक रुपयांची इलेक्ट्राँनिक्स वस्तूंची खरेदी करावी लागेल.रिलायन्स डिजिटल, माय जिओ, जियो पाँइंट किंवा जिओ मार्ट डिजिटल एक्स्क्लुझिव्ह स्टोअरवर तुम्हाला खरेदी करता येणार आहे. 

जिओने आणलेली ऑफर

रिलायन्स जिओने नुकतेच आपल्या आठव्या वर्षपूर्तीवर स्पेशल रिचार्ज प्लान आणले. ज्यामध्ये झोमॅटो गोल्ड मेंबरशिप, ओटीटी सब्सस्क्रिप्शन आणि ई काँमर्स वॉऊचर देण्यात आले होते.8 सप्टेंबरपर्यंत असणाऱ्या या ऑफरमध्ये 899 रुपये आणि 999 रुपयांचा तिमाही रिचार्ज प्लान मिळत होता.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *