तुमच्या स्मार्टफोनचं स्टोरेज फुल झालंय? स्पेस करणासाठी करा ‘हे’ उपाय..


Smartphone Storage Problem: आजकाल फोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यात वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ काढणे, गेम खेळणे, सोशल मीडिया वापरणे आणि इतर वेगवेगळ्या गोष्टींसाठी इंटरनेट वापरणे यासारख्या अनेक कारणांसाठी स्मार्टफोनचा वापर दैनंदिन आयुष्यात केला जातो. पण यासगळ्यासाठी फोनचा वापर करत असताना जेव्हा फोनचे स्टोरेज फुल्ल होते, तेव्हा ते त्रासाचे कारण बनते. जर तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल तर काळजी करू नका. फोनचे स्टोरेज कमी करण्यासाठी किंवा रिकामे करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत. चला जाणून घेऊया नेमके कोणते आहेत ते उपाय. 

स्मार्टफोनचे स्टोरेज का फुल होते? 

अ‍ॅप्स : तुम्ही आपल्या फोनमध्ये वेगवेगळ्या कामासाठी अ‍ॅप्स इंस्टॉल करता. ते अ‍ॅप्स आणि त्याचा डेटा आपल्या फोनमधील बऱ्यापैकी जागा व्यापतात. त्यामुळे तुमच्या फोनचे स्टोरेज फुल होऊ शकते. 

फोटो आणि व्हिडिओ : हाय रेजोल्यूशन असलेले फोटो आणि व्हिडिओमुळे सगळ्यात जास्त स्टोरेज वापरले जाते. 

ऑडिओ फाइल्स : गाणी, संगीत आणि इतर अनेक ऑडियो फाइल्समुळे स्टोरेज कमी होते. 

कॅशे, कुकीज आणि इतर फाइल्स : कुकीज आणि कॅशे यासह इतर तात्पुरत्या स्वरूपातील फाइल्सही जागा व्यापतात.

कसे कराल स्मार्टफोनचे स्टोरेज रिकामे?

अनावश्यक ॲप्स काढून टाका :
ज्या ॲप्सचा वापर तुम्ही खूप दिवसांपासून केलेला नाही किंवा ज्यांची तुम्हाला गरज नाही ते ॲप्स तुमच्या फोनमधून काढून टाका. सोशल मीडिया ॲप्समधून अनावश्यक डेटा हटवा.

तुमचे फोटो आणि व्हिडिओ क्लाउडमध्ये स्टोअर करा :
गुगल फोटोज, आय क्लाउड (Google Photos, iCloud) किंवा इतर कोणत्याही क्लाउडचा वापर करून त्यात तुमचे फोटो आणि व्हिडिओ स्टोअर करा. हाय रेजोल्यूशन फोटो आणि व्हिडिओ कमी रिझोल्यूशनमध्ये रूपांतरित करून स्टोअर करा.

ऑडिओ फाइल्स ऑनलाइन स्ट्रीम करा : 
गाणी डिव्हाइसवर स्टोअर करून ठेवण्याऐवजी ऑनलाइन स्ट्रीम करा. तुम्ही गाणे ऐकण्यासाठी Spotify, Apple Music, Wynk Music सारख्या स्ट्रीमिंग सर्विसेस वापरू शकता.

कॅशे आणि कुकीज क्लियर करा :
तुमच्या ब्राउझर आणि इतर ॲप्समधून कॅशे आणि कुकीज नियमितपणे क्लियर करा. कारण अशा तात्पुरत्या स्वरूपातील फाइल्सही जागा व्यापतात.

मायक्रोएसडी कार्ड वापरा :
तुमच्या डिव्हाइसमध्ये SD कार्ड स्लॉट असल्यास, तुम्ही SD कार्डवर फोटो, व्हिडिओ आणि इतर फाइल्स स्टोअर करू शकता. त्यामुळे तुमच्या फोनचे स्टोरेज अतिरिक्त वापरले जाणार नाही.

फ्री अप स्पेसचा वापर करा : 
काही स्मार्टफोनमध्ये स्टोरेज स्क्रीनच्या वरती फ्री अप स्पेस नावाचा एक ऑप्शन असतो त्यावर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला तुम्ही डिलीट करू शखता अशा फाइल्सची यादी दिसेल.   





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *