तासन् तास राबण्यापेक्षा ‘हे’ करा; Dell च्या CEO नं दिली यशाची गुरुकिल्ली


मागील काही वर्षांमध्ये नोकरीच्या ठिकाणी असणारं वातावरण, कामाचे तास आणि कर्मचाऱ्यांकडून असणाऱ्या अपेक्षा या साऱ्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम कर्मचाऱ्यांवर होताना दिसला. त्यातच आता एका प्रचंड अनुभवी व्यक्तीनं मात्र या वर्षानुवर्षांच्या कार्यपद्धतीला शह देणारा एक कमाल गुरुमंत्र सर्वांनाच दिला आहे. ही व्यक्ती आहे Dell या कंपनीचे सर्वेसर्वा मायकल डेल. 

डेल कंपनीचे मालक मायकल डेल म्हणतात, “आजच्या काळात आपल्याला अधिक मेहनत करण्याऐवजी ‘स्मार्ट’ पद्धतीने काम केलं पाहिजे आणि हसत राहिलं पाहिजे.” ‘इन गुड कंपनी’ नावाच्या एका कार्यक्रमात, मायकल डेल हे आपल्या काम करण्याच्या पद्धती आणि दैनंदिन जीवनाबद्दल बोलले. ‘कामासोबतच आपल्या आयुष्याचीही काळजी घेणं खूप गरजेचं आहे’, असं त्यांनी सांगितलं. 

हेही वाचा‘या’ कंपनीने Airtel, Jio चं वाढवल टेन्शन! 100Mbps प्लॅनमध्ये फ्री मिळतंय OTT

दिवसभर काम करुन हवं तसं काम होत नाही, असं आपण फार आधीच ओळखल्याचं सांगत त्यांनी अनेक टेक कंपन्यांच्या कार्यपद्धतीवर टीकेचा सूर आळवत जास्तीत जास्त काम करण्याच्या विचारावर निशाणा साधला. 

याच अफलातून विचारसरणीच्या बळावर या 59 वर्षीय अब्जाधीशाने मागील म्हणजेच 2023 या वर्षी 88 अब्ज डॉलरचा व्यवसाय केला. ते इतरांना जे सल्ले देतात तेच त्याचच पालन ते स्वत:सुद्धा करतात. ते रात्री 8:30 किंवा 9:00 वाजता झोपतात आणि सकाळी लवकर उठून व्यायाम करतात. ते म्हणतात, रात्री उशिरापर्यंत आपण कधीच जागत असताना भेटणार नाही कारण ती झोपण्याचीच वेळ असते. 

कर्मचाऱ्यांना दिला ‘हा’ सल्ला

‘डेल’ फक्त आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नव्हे तर कामाच्या बाबतीत सुद्धा इतरांना सल्ले देतात. काम करताना मजा-मस्करी करणं खूप गरजेचं आहे असं ते मानतात. ते म्हणतात, “जर तुम्ही कामाच्या दरम्यान हसू शकत नसाल किंवा मस्करी करु शकत नसाल तर तुमचं काहीतरी चुकतंय असं समजा.” तरुणांना सल्ला देत ते म्हणाले, “नवीन गोष्टींना सामोरे जा, संकटं पत्करा, चुका करा, कठीण आव्हानांना सामोरे जा, काहीतरी मौल्यवान करा, घाबरु नका आणि साहसी बना.”

कामासोबतच खेळणं आणि आराम करणं सुद्धा गरजेचं आहे असं म्हणत या धनाढ्य व्यक्तीनं आधिक काम केल्यानं यश मिळत नसून,  याउलट काम आणि आराम यांचं योग्य संतुलन सांभाळल्यानंही यश मिळतं हा एक सोपा आणि सहजगत्या समजणारा सल्ला सर्वांनाच दिला.

 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *