Apple iPhone Launch Event : अॅपलच्या नवीन फोनचे म्हणजेच iPhone 16 सिरीज त्याचबरोबर अॅपल वॉच सिरीज 10, अॅपल एअरपॉडस् 4 आणि अजून अनेक नवीन डिव्हाइस लाँच होणार आहेत. अॅपलने आपल्या या इव्हेंटला ग्लोटाईम (Glowtime) हे नाव दिले आहे. या कार्यक्रमात अॅपल आपल्या नवीन सॉफ्टवेअरचे अपडेट- iOS 18, iPadOS 18, tvOS 18, watch 11, visionOS 2 आणि macOS Sequoia यांच्या रिलीजच्या तारखाही जाहीर करणार आहे.
इथे बघू शकता लाईव्ह स्ट्रीमिंग
iPhone 16 आणि इतर प्रॉडक्टचा लाँच इव्हेंट भारतात रात्री 10:30 वाजता होणार आहे. हा कार्यक्रम अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये होणार आहे. तुम्ही हा कार्यक्रम अॅपलच्या वेबसाईटवर, अॅपल टिव्ही अॅपवर आणि अॅपलच्या यूट्यूब चॅनलवर बघू शकता.
किती असेल या फोनची किंमत
मिळालेल्या माहितीनुसार, iPhone 16 च्या या सिरीजमध्ये एकून चार मॉडेल्स आहेत. iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max. यात iPhone 16 या बेस मॉडेलची किंमत 799 डॉलर असू शकते. म्हणजे भारतात या फोनची किंमत 66,300 रूपये असू शकते. तर iPhone 16 Plus या फोनची किंमत 74,600 रूपये असू शकते असा अंदाज आहे. आता यात जर आपण प्रो मॉडेलचा विचार केला तर iPhone 16 Pro ची किंमत भारतात जवळपास 91,200 रूपयांपर्यंत असू शकते. तर यात टॉप मॉडेल म्हणजे iPhone 16 Pro Max ची किंमत 99,500 रूपये असू शकते.
फोनच्या विज्युअल इफेक्टस् मध्ये बदल
आज होणाऱ्या अॅपलच्या लाँच इव्हेंटचं नाव ग्लोटाईम आहे त्याच्यासाठी एक विशिष्ट लोगो ठेवण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टसच्या आधारे असं सांगण्यात येत आहे की हा लोगो iPhone मधील विज्युअल बदलाला दर्शवतो. याशिवाय नोटिफिकेशन इफेक्टसमध्येही बदल बघायला मिळू शकतात.
अॅपलच्या या नवीन फोनमध्ये Apple Intelligence पण मिळणार आहे. या आयफोनमध्ये तुम्हाला OpenAI चे ChatGPT चे इंटिग्रेशन बघायला मिळेल. या अॅपल आयफोन्समध्ये ChatGPT-4o सुद्धा वापरता येणार आहे.
कॅमेरा डिजाईनमध्ये बदल
iPhone 16 च्या कॅमेरा डिजाईनमध्ये बदल बघायला मिळू शकतो. हा कॅमेरा काहीसा iPhone 11 सारखा असण्याची शक्यता आहे. यात कॅप्सूल सारख्या डिजाईनचा वापर केला जाईल. डायगोनल अरेंजमेंन्टच्या ऐवजी याचा वापर केला जाईल. कंपनी कॅमेरा सेंसर आणि लाईट सेंसरला अजून जास्त चांगले बनवू शकते.