Ghibli Trend: सोशल मिडीयावर सध्या गिबली ट्रेंड चांगलाच धुमाकुळ घालतोय. AI प्लॅटफॉर्म किंवा ChatGPT द्वारे आपल्या फोटोंचं सुंदर अॅनिमेशन केलं जातंय.या गिबलीने अनेकांना प्रचंड वेड लावलंय, मात्र सोशल मिडीयावरचा हा ट्रेंड तुमची खासगी माहिती चोरतीये. AI कंपन्यांवर लोकांचा डेटा विकल्याचा आरोप होतोय.
सध्या देशभरात गिबलीचा ट्रेंड चांगलाच लोकप्रिय ठरतोय. राजकारण्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळेच आपले गीबली स्टाइलचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. सुंदर बॅकग्राऊंड, फोटोतील टपोरे डोळे, पेस्टल कलर्स यामुळे कुणालाही या फोटोजची भुरळ पडेल…पण या गिबलीच्या माध्यमातून तुमचा खासजी डेटा, तुमचे फोटो दुस-यांना विकले जातायेत. ऐकून धक्का बसेल, पण AI कंपन्यांवर हा आरोप होतोय.
चेहरा म्हणजे आपली ओळख.हे फोटो अपलोड करत आपण आपली बायोमेट्रिक माहिती अर्थात आपल्या चेह-याची ओळख निर्धास्तपणे AI कंपनीला देतोय.पण त्याचा भविष्यात वेगळ्या कारणसाठीही वापर होण्याची शक्यता आहे. गिब्ली हे एक एआय टूल आहे.ज्यात युजरचा डेटा लाईफटाईम सेव्ह राहतो. हा डेटा कंपनी विकू किंवा शेअर करू शकते असा आरोप होतोय. डार्कवेब अथवा डिपफेकसाठी फोटोचा वापर होऊ शकतो. दरम्यान तुमच्या डेटाचा गैरवापर होऊ शकतो.यापासून वाचण्यासाठी खबरदारी आणि काळजी घेणं महत्वाच आहं.
काय काळजी घ्याल?
सोशल मीडियावर हाय-रिझोल्यूशन फोटो अपलोड करणे टाळा. फेस अनलॉक ऐवजी पासवर्ड किंवा पिन वापरा. कोणत्याही अज्ञात ॲपला कॅमे-याचा अक्सेस देऊ नका. अॅनिमेटर आणि दिग्दर्शक हायाओ मियाझाकी, यांनी 1985 मध्ये या गिब्ली स्टाईल स्टुडीओला सुरूवात केली.त्यांनी हि कला इतकी वर्ष जोपासली मोठी केली.पण आता एआय तंत्रज्ञानामुळे एका क्षणात मियाझाकी गिब्ली फोटो तयार होतो. त्यामुळे यावर अनेकांनी आक्षेपही घेतलाय.एका कलाकाराचं काम AI ने चोरल्याचाही आरोप होतोय. या गिबलीमुळे आता मात्र तुमच्या फोटोची सुरक्षितताही धोक्यात आहे.त्यामुळे भविष्यात गिब्ली किंवा इतर ट्रेंडमध्ये वाहवत जाताना काळजी नक्की घ्या.